Abhijeet Dipke Detained : मोठी बातमी! अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात, विमानात घुसून कारवाई

Abhijeet Dipke CJP : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विमानात घुसून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Abhijeet Dipke.jpg
Abhijeet Dipke.jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

CJP News : दिल्ली विमानतळावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके पोहोचताच पोलिसांनी मोठा कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. दीपके हे आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत जंतर मंतर येथे आंदोलन करणार आहेत. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती.

पोलिस विमानात आल्यानंतर दीपके यांनी सोशल मीडियावर लाईव्ह करत मला अटक करा, मी अटक करून घेण्यासाठीच आलो आहे. त्यावर पोलिसांनी आम्ही तुम्हाला अटक करत नाही, कृपया सहकार्य करा असे म्हणत ताब्यात घेतले.

दीपके यांच्या सोबत त्यांचे सहकारी अशितोष रांका, सौरभ दास हे देखील त्यांच्यासोबत होते. पोलिसांनी अजून दीपके यांना कोठे घेऊन जाणार आहे, याची माहिती दिली नाही. तसेच तो अजुनही विमानतळावरच आहेत. दीपके यांच्यासोबत रांका आणि दास यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी अभिजीत दीपके यांना पुन्हा मुंबईत जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार देत आपण आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मांडली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत पोलिसांन त्यांना पुन्हा मुंबईला जाण्यास सांगत होते.

Abhijeet Dipke.jpg
CJP Delhi Protest: "माशीला मारायला हातोड्याची काय गरज?" सुप्रीम कोर्टाची टिप्पणी; सीजेपीच्या आंदोलनावेळी रेल्वे, मेट्रो सेवा बंद न ठेवण्याचे कोर्टाचे निर्देश

दिल्ली पोलिसांनी कालच स्पष्ट केले होते की, सीजेपीच्या आंदोलनासाठी कुठलीही परवानगी दिली नाही. नवी दिल्लीत 163 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनास परवानगी नाही. त्यामुळे जर आंदोलन केले तर कारवाई केली जाईल.

दरम्यान, पोलिसांनी काल पासूनच सीजेपीच्या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. आज देखील जंतर मंतरवर येत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल ५०० पेक्षा अधिक अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. दरम्यान, दीपके आि त्यांचे सहकारी आंदोलनस्थळी न पोहोचल्याने आंदोलनाचे काय होणार? असा प्रश्न दिल्लीत पोहोणाऱ्यांना पडला आहे.

Abhijeet Dipke.jpg
CJP Protest: ‘ज्ञानू आता तुझी पाळी आली’ कॉक्रोजच्या आंदोलनात प्रकाश राज यांचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com