CJP Delhi Protest: "माशीला मारायला हातोड्याची काय गरज?" सुप्रीम कोर्टाची टिप्पणी; सीजेपीच्या आंदोलनावेळी रेल्वे, मेट्रो सेवा बंद न ठेवण्याचे कोर्टाचे निर्देश

CJP Delhi Protest: कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनं दिल्लीच्या जंतर-मंतरवर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
CJP Delhi protest
CJP Delhi protestSarkarnama
Published on: 
Updated on: 

CJP Delhi Protest: कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनं दिल्लीच्या जंतर-मंतरवर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. उद्या १० ऑक्टोबर २०२६ रोजी हे आंदोलन होणार असून दिल्ली पोलिसांनी मात्र याला परवानगी नाकारली आहे. पण तरीही आंदोलनावर अभिजीत दिपके आणि त्यांच्या टीममधील सदस्य ठाम आहेत. त्यासाठी जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. याचे रील्स आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दिल्लीला जोडणाऱ्या सर्व एक्स्प्रेस, मेट्रो ट्रेन्स आणि इतर सरकारी वाहतूक उद्या बंद ठेवली आहे. याविरोधात सीजेपीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली, त्यानंतर कोर्टानं सरकारला झापलं असून यासंदर्भात महत्वाचे निर्देश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडं येणाऱ्या रेल्वे सेवा पूर्णपणे थांबवू नका. तसंच दिल्ली मेट्रो स्टेशन्स बंद करु नका. या सेवा नियमित आणि नियंत्रित पद्धतीनं सुरु ठेवा, ज्यामुळं सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असे निर्देश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत. त्यामुळं आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानंतर सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागणार आहे.

CJP Delhi protest
CJP Protest: ‘ज्ञानू आता तुझी पाळी आली’ कॉक्रोजच्या आंदोलनात प्रकाश राज यांचा इशारा

दरम्यान, सरकारनं रेल्वे आणि मेट्रो बंद करण्याच्या निर्णयावर अभिजीत दिपकेंनी सडकून टीका केली आहे. केंद्र सरकारनं आणलेली ही आणीबाणी असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर दिल्लीत इंडिया आघाडीनं नुकतंच तीन दिवस सलग आंदोलन केलं. त्यानंतर आता सीजेपीचं आंदोलन होणार आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणावरुन माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीनं जोरदार आंदोलन केलं होतं. त्याचा मोठा दबाव निर्माण होऊन सरकारनं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. तसंच या आंदोलनात सहभागी झालेल्या जेनझी तरुणाईवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यानं त्यानं देशभरात दिल्ली पोलिसांना टीकेचं धनी व्हायला लागलं होतं.

यापार्श्वभूमीवर उद्याच्या आंदोलनात हीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी सरकारनं रेल्वे, मेट्रो, खाद्यपदार्थ्यांची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच जे लोक आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यांना पोलिसांनी नोटीसा देखील पाठवल्या आहेत.

माशीला मारायला हातोड्याची गरज काय? - सुप्रीम कोर्ट

दरम्यान, सरकारनं उद्याच्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान मेट्रो बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, माशीला मारण्यासाठी हातोड्याची काय गरज? अर्थात केवळ आंदोलन रोखण्यासाठी एवढी शक्ती खर्च करण्याची गरज काय? असं सुप्रीम कोर्टानं सुचवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com