Congress news : काँग्रेस कार्यालयात जोरदार राडा; 'मी राहुल गांधींचा हनुमान' म्हणणारा बडा नेता अन् नगरसेविका आमनेसामने; Video व्हायरल...

Ajay Rai, Mamta Chaudhary, Uttar Pradesh Congress office clash, Ajay Rai viral video : अजय राय हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे मातब्बर नेते आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दोनदा लोकसभा निवडणूक लढविली आहे.
Ajay Rai, Mamta Chaudhary, Uttar Pradesh Congress office clash
Ajay Rai, Mamta Chaudhary, Uttar Pradesh Congress office clashSarkarnama
Published on: 
Updated on: 

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात रविवारी जोरदार राडा झाला. पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून हे प्रकरण थेट एकमेकांवर चपला उगारण्यापर्यंत गेले. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि नगरसेविका ममता चौधरी यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. काहींना मारहाण झाल्याचेही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते.

लखनौ येथील मुख्यालयात रविवारी नवनियुक्त अध्यक्ष आराधना मिश्रा मोना यांचा पदग्रहण समारंभ होता. अजय राय यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी अजय राय हे पदभार सोपविण्यासाठी आले होते. राय यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी होती. यादरम्यान ममता चौधरी आणि या कार्यकर्त्यांमध्ये काही कारणांवरून वाद झाला.

वाद टोकाला पोहचल्यानंतर चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी थेट धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. तसेच कार्यकर्त्यांना चपलेने मारल्याचा आरोप राय यांनी केला. राय आणि चौधरी यांच्यातही वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. भाजपनेही त्यावरून टीका केली आहे.

Ajay Rai, Mamta Chaudhary, Uttar Pradesh Congress office clash
कायद्यातील 'या' दोन कलमांच्या आधारे पोलिसांनी CJP नेत्यांची केली कोंडी

नाराज झालेले अजय राय हे कार्यक्रमातून निघून चालले होते. पक्षाचे कायकारी अध्यक्ष इमरान मसूद, आराधना मिश्रा मोना आणि राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी त्यांची समजूत काढून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. राय यांनी ममता चौधरींवर कारवाईची मागणी केली आहे. कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतरच ते पुन्हा पदग्रहण कार्यक्रमात सहभागी झाले.

Ajay Rai, Mamta Chaudhary, Uttar Pradesh Congress office clash
Supreme Court hearing : सुप्रीम कोर्टाचे दरवाजे रविवारीही उघडले; दिल्ली पोलिसांसह केंद्र सरकारलाही नोटीस, दिले महत्वाचे आदेश

दरम्यान, अजय राय हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे मातब्बर नेते आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दोनदा लोकसभा निवडणूक लढविली आहे. २०२४ च्या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या लक्षणीय मतांची चर्चा झाली होती. तसेच आपण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हनुमान असल्याचेही ते सातत्याने सांगत असतात. त्यांना काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com