Actress Ranya Rao: ...म्हणून अभिनेत्री रान्या राव हिचा मुक्काम वर्षभर कारागृहातच राहणार !

Bengaluru Smuggling Case : डीजीपी दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याची कन्या असलेल्या अभिनेत्री रान्या रावला विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. तिच्यावर सोन्याची तस्करी करण्याचा आरोप आहे.
Actress Ranya Rao News,
Actress Ranya Rao NewsSarkarnama
Published on
Updated on

Bengaluru News : डीजीपी दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याची कन्या असलेल्या अभिनेत्री रान्या रावला विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. तिच्यावर सोन्याची तस्करी करण्याचा आरोप आहे. तिच्याकडून 14 किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. त्याचे बाजारमूल्य 12.56 कोटी रुपये आहे. तिच्यावर निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात पोलिसांना 2.67 कोटी रुपयांची रोकड आढळली आहे.

दुबईहून सोन्याच्या दागिन्यांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेत्री रान्या रावविरुद्ध (Ranya Rao) परकीय चलन संरक्षण आणि तस्करी प्रतिबंधक कायदा (सीओएफईपीओएसए) 1974 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) शिफारशीवरून केंद्रीय आर्थिक गुप्तचर ब्युरोने (सीईआयबी) रान्या आणि इतर आरोपींविरुद्ध सीओएफईपीओएसए कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार आरोपी रान्या रावला एक वर्षापर्यंत जामीन (Bail) मिळू शकणार नाही.

Actress Ranya Rao News,
BJP News: भाजपनं विदर्भात डाव साधला; शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड

जामिनावर सुटल्यानंतर आरोपींनी तस्करीत सहभागी होऊ नये म्हणून हा कायदा लागू करण्यात आला आहे. जर आरोपी तपास यंत्रणांना सहकार्य करत नसल्याचे आढळले, तर हा कायदा देखील लागू होईल.

या प्रकरणात रान्या राव आणि इतरांनी वारंवार जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर केंद्रीय एजन्सींनी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. इतर आरोपी तरुण राजू आणि साहिल सकारिया जैन यांच्याविरुद्धही सीओएफईपीओएसए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

12.56 कोटींचे 14.2 किलो सोन्याची दुबईहून बेकायदेशीरपणे तस्करी केल्याच्या आरोपाखाली वरिष्ठ पोलिस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी असलेल्या रान्या राव हिला तीन मार्च रोजी बंगळूर विमानतळावर अटक करण्यात आली.

Actress Ranya Rao News,
Dharmaravbaba Atram Statement: धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाबाबत केलं मोठं विधान अन् राजकीय चर्चांना आलं उधाण!

रान्या राव आणि इतर दोन आरोपी सध्या बंगळूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. या प्रकरणाची चौकशी डीआरआय, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे.

रान्या राव असे अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे. कर्नाटक केडरचे आयपीए अधिकारी रामचंद्र राव यांची ती मुलगी आहे. रामचंद्र राव डीजीपी दर्जाचे (DGP)चे अधिकारी आहेत.

पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे ते संचालक आहेत.रान्या राव ही कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. तिला बैंगलुरु येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून 14 किलो 8 ग्रॅम सोने जप्त केल्याची माहिती बैंगलुरु येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रान्या ही दुबईवरुन येत असताना तिच्यावर ही कारवाई करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com