महागाईच्या झळा! विधानसभा निवणुका संपताच एलपीजी सिंलिंडर हजार रुपयांवर जाणार?

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाचा भडका उडाला आहे.
LPG Cylinder
LPG CylinderSarkarnama

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाचा भडका उडाला आहे. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि इतर आर्थिक घडामोडांमुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. यामुळे लवकरच पेट्रोल (Petrol), डिझेलसोबत (Diesel) एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) दरवाढीचा भडका उडणार आहे. देशांतील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच दरवाढीचे चटके बसण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी 6 ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झालेली नाही. देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडताच 7 मार्चनंतर एलपीजी सिलिंडरचे दर 100 ते 200 रुपयांनी वाढू शकतात. सध्या सिलिंडरचा दर सुमारे 900 रुपये आहे. तो हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला एलपीजी सिलिंडर दरवाढीचे चटके बसणार आहेत.

देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग कमी झाला असून, याचवेळी महागाई वाढू लागली आहे. याचा परिणाम अनेक बड्या केंद्रीय बँकांच्या पतधोरणावर आहे. याचवेळी रशियांने युक्रेनवर हल्ला केल्याने खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 100 डॉलरवर गेला आहे.

LPG Cylinder
नवाब मलिकांची प्रकृती सुधारली; रुग्णालयातून आज पुन्हा ईडीच्या कोठडीत रवानगी

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या भावाने 2014 नंतरच्या उच्चांकी पातळी आहे. मागील वर्षी याच काळातील भावाच्या तुलनेत आता खनिज तेलाचा भाव 50 टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही विधानसभा निवडणुकांमुळे हे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडर दरांचा भडका उडणार आहे. पेट्रोल प्रतिलिटर 125 रुपयांवर जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

LPG Cylinder
युद्ध रशिया-युक्रेनचे अन् फटका भारताला; गुंतवणूकदारांचे साडेतीन लाख कोटी पाण्यात

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली. मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 रुपये आणि डिझेलचा दर 94.14 रुपये आहे. देशांतील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळेच पेट्रोल, डिझेलसह एलपीजी सिलिंडरची दरवाढ रोखण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com