विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींचा विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) महापालिका निवडणुकांमध्ये (Civic Polls) तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjee Sarkarnama
Published on
Updated on

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेल्या महापालिका निवडणुकांत (Municipal Election) एकदा तृणमूल काँग्रेसने (TMC) आघाडी घेतली आहे. राज्यात चार महापालिका निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. तृणमूलने चारही महापालिकांमध्ये आघाडी घेतली असून, काँग्रेस (Congress), भाजप (BJP) आणि डाव्यांना धोबीपछाड दिला आहे. यानंतर तृणमूलच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी माँ, माटी, मानुषचा नारा दिला आहे.

राज्यातील विधाननगर, सिलिगुडी, चंदननगर आणि असनसोल या चार महापालिकांची निवडणूक 12 फेब्रुवारीला झाली होती. आज या चारही महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. विधाननगरमध्ये 41 पैकी 39 जागा मिळवून तृणमूलने झेंडा फडकावला आहे. याचवेळी काँग्रेसला केवळ एक तर भाजपला भोपळाही फोडता आला नाही. असनसोल महापालिकेतील 106 जागांपैकी 54 जागांवर तृणमूलने आघाडी घेतली आहे. याचवेळी भाजप 4 जागांवर पुढे आहे. चंदननगर महापालिकेत 32 पैकी 19 जागांवर तृणमूल काँग्रेस पुढे आहे. डाव्या आघाडीला केवळ एका जागेवर आघाडी मिळाली आहे. सिलिगुडी महापालिकेत 47 पैकी 38 जागांवर तृणमूल आघाडीवर असून, भाजप आणि डावी आघाडी प्रत्येकी चार जागांवर पुढे आहे. चारही महापालिकांत तृणमूलने बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवून भाजप, काँग्रेससह डाव्या पक्षांना धूळ चारली आहे.

Mamata Banerjee
महापालिका निवडणुकीत दे धक्का! काँग्रेसला केवळ एक जागा तर भाजपला भोपळा

या विजयानंतर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हा माँ, माटी, मानुषचा अभूतपूर्व विजय आहे. असनसोल, विधाननगर, सिलिगुडी आणि चंदननगर महापालिकेतील जनतेचे मी आभार मानते. त्यांना महापालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे. यापुढेही आम्ही आमची विकासाची काम पुढे नेत राहू. माँ, माटी, मानुषचे अतिशय मनापासून आभार!

Mamata Banerjee
हिजाब बंदीवरून रामकृष्ण आश्रमाच्या स्वामी भावेशानंद यांनी हिंदुत्ववाद्यांना फटकारले...

राज्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने काही दिवसांपूर्वी कोलकता महापालिकेत मोठा विजय मिळवला होता. कोलकता महापालिकेतील 144 जागांपैकी 134 जागा तृणमूलने जिंकल्या. मागील निवडणुकीपेक्षा पक्षाने दहा जागा जास्त मिळवल्या. त्यामुळे इतर महापालिकांच्या निवडणुकांकडे लक्ष लागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com