Ahmedabad plane crash: 270 जणांचा बळी घेतलेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सर्वात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश

biggest aviation disaster India News : या अपघात प्रकरणाची चौकशी सुरु होती. यामध्ये प्रथमदर्शनी विमान वाहतूक सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane CrashSarkarnama
Published on
Updated on

Ahmedabad News: अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या विमान अपघातात 270 लोकांचा मृत्यू झाला होता. अहमदाबाद विमनातळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-171 टेकऑफ घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. कोसळलेले हे विमान मेडिकल कॉलेज हॉस्टेलला धडकले होते. त्यामुळे या अपघातात प्रवाशांसह एकूण 270 जणांचा मृत्यू झाला होता.

या अपघातानंतर एअर इंडियाने सर्वात मोठी ऍक्शन घेतली आहे. एअर इंडियाच्या तीन वरिष्ठा अधिकाऱ्यांना काढून टाका, असे निर्देश डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालकाकडून देण्यात आले आहेत. या अपघात प्रकरणाची चौकशी सुरु होती. यामध्ये प्रथमदर्शनी विमान वाहतूक सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातानंतर (Plane Crash), डीजीसीएने शनिवारी एअर इंडियाला तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले होते. यामध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग करणाऱ्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंग प्लॅनिंगमध्ये सहभागी असलेल्या पायल अरोरा यांचा समावेश आहे. एअर इंडियाने या अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांमधून तत्काळ काढून टाकावे. या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ आंतर-विद्याशाखीय कारवाई सुरू करावी, असे आदेश दिले आहेत.

Ahmedabad Plane Crash
Uddhav Thackeray meeting : उद्धव ठाकरेंच्या ताज लँड्स हॉटेलमधील बंद दाराआड बैठकीचा तपशील बाहेर; आमदार-खासदारांना दिला 'हा' संदेश

डीजीसीएचा आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कंपनीचे मुख्य ऑपरेशन्स अधिकारी एकात्मिक ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरवर थेट लक्ष ठेवणार आहेत. पीटीआय वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसर हा आदेश 20 जून रोजी देण्यात आला होता. हे आदेश आज समोर आले आहेत.

Ahmedabad Plane Crash
Tejasvee Ghosalkar : संचालक होताच तेजस्वी घोसाळकरांचे सूर बदलले; म्हणाल्या, 'राजकीय नजरेतून...' टार्गेटवर भाजप की उद्धव ठाकरे?

डीजीसीएने हे निर्देश देखील दिले आहेत की, एअर इंडियाने (Air India) या अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांमधून तत्काळ काढून टाकावे. या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ आंतर-विद्याशाखीय कारवाई सुरू करावी. 10 दिवसांच्या आत डीजीसीएला कळवावे, अशा सूचना केल्या आहेत.

Ahmedabad Plane Crash
Tejaswi Ghosalkar statement : भाजप की उद्धव ठाकरे ? संचालक झालेल्या तेजस्वी घोसाळकरांनी स्पष्टच सांगितले; म्हणाल्या, साथ सोडणार...

सुधारात्मक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांना नॉन-ऑपरेशनल पोस्टवर बदली करावी आणि त्यांना कोणत्याही उड्डाण सुरक्षा किंवा क्रू अनुपालन संबंधित पदांवर काम करण्याची परवानगी देऊ नये. भविष्यात क्रू शेड्युलिंग, परवाना किंवा उड्डाण वेळेशी संबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.

Ahmedabad Plane Crash
Shivsena Politics: महाडिक, मुश्रीफ अन् सतेज पाटलांच्या बालेकिल्ल्यात शिंदे मोठा धमाका करणार; एक दोन नव्हे,तर 30 मात्तबर नेते ...

गेल्या दहा दिवसांपासून सतत एअर इंडियाची उड्डाणे रद्द केली जात आहेत. एअर इंडियाच्या ताफ्यात 33 बोईंग 787- 8/9 विमाने आहेत. तथापि, गेल्या 10 दिवसांपासून त्यांची उड्डाणे सतत रद्द केली जात आहेत. त्यामुळे येत्या काळात याबाबत काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ahmedabad Plane Crash
Devendra Fadnavis : आळंदीत कत्तलखाना! विकास आराखड्यात आरक्षण; CM फडणवीसांनी थेट सांगितलं, 'मी आदेश...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com