Tejaswi Ghosalkar statement : भाजप की उद्धव ठाकरे ? संचालक झालेल्या तेजस्वी घोसाळकरांनी स्पष्टच सांगितले; म्हणाल्या, साथ सोडणार...

BJP or Uddhav Thackeray News : संचालकपदी वर्णी लागताच तेजस्वी घोसाळकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
Tejaswi Ghosalkar
Tejaswi Ghosalkarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांच्या निधनाने रिक्त असलेले संचालकपद तेजस्वी यांना देण्यात आले. मुंबई जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात असून आमदार प्रवीण दरेकर हे बँकेचे अध्यक्ष आहेत. संचालकपदी वर्णी लागताच तेजस्वी घोसाळकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या सर्व सुरु असलेल्या चर्चाना त्यांनी पूर्णविराम देत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

माजी नगरसेविका असलेल्या तेजस्वी यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नाराज असलेल्या तेजस्वी यांची मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी समजूत काढली होती. त्यानंतर त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी आपण आणि तेजस्वी ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगितले होते.

Tejaswi Ghosalkar
MNS On Shivsena: उध्दव ठाकरेंनी युतीचे संकेत देऊन 24 तास होत नाही, तोच मनसे नेता भडकला; प्रश्नांचा मारा अन् करुन दिली 'ती' आठवण

त्यानंतर चार दिवसापूर्वी मातोश्रीवर झालेल्या माजी नगरसेवकाच्या बैठकीला तेजस्वी यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर शुक्रवारी मुंबई बँकेंच्या संचालकपदी तेजस्वी यांची नियुक्ती झाल्याने भाजप (Bjp) त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी पाऊले टाकत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, या सर्व चर्चा फेटाळून लावत मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातच राहणार असून त्यांची साथ सोडणार नसल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

Tejaswi Ghosalkar
Shivsena MNS alliance : "मनसेसोबत युती केल्यास थोड्या तरी जागा येतील..."; चंद्रकात पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

काही दिवसापूर्वी मी पक्षावर नाराज होते पण माझी नाराजी आता दूर झाली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा भेट घेणार आहे. राजकारण आणि सहकार बाजुला ठेवून समाजकरणाचे काम येत्या काळात करणार असल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितले.

Tejaswi Ghosalkar
Devendra fadnavis Vs Sharad Pawar : जळगाव दौऱ्यात CM फडणवीसांना काळा झेंडे दाखवले, शरद पवारांचे शिलेदार आक्रमक

या पूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे. मात्र, सहकार क्षेत्रात पहिल्यांदाच काम करीत आहे. संपर्क साधणारे कसेही संपर्क करतात, मात्र मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबतच काम करणार असल्याचे सांगत त्यांनी भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाना तेजस्वी यांनी पूर्णविराम दिला आहे.

Tejaswi Ghosalkar
Tejasvee Ghosalkar : संचालक होताच तेजस्वी घोसाळकरांचे सूर बदलले; म्हणाल्या, 'राजकीय नजरेतून...' टार्गेटवर भाजप की उद्धव ठाकरे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com