AI summit protest row : AI समिट शर्टलेस आंदोलन प्रकरण पेटलं; तीन राज्यांचे पोलीस एकमेकांना भिडले, दिल्ली पोलिसांवर थेट अपहरणाचा गुन्हा...

Himachal Pradesh Police case : दिल्ली पोलिसांनी आरोपांना अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही, असा दावा शिमला पोलिसांनी केला आहे.
Youth Congress protest AI summit
Youth Congress protest AI summitSarkarnama
Published on
Updated on

Delhi Police kidnapping allegation : दिल्लीत भारत मंडपमध्ये आयोजित AI समिटमध्ये शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचाही समावेश आहे. त्यानंतर दिल्लीसह हरियाणातील पोलीस काँग्रेसच्या आणखी काही पदाधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करत आहेत. या कारवाईदरम्यान मागील काही तासांत तीन राज्यांचे पोलिसच एकमेकांना भिडल्याचे समोर आले आहे.  

युवक काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यावरून हिमाचल प्रदेशात मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीसह हरियाणा आणि हिमाचल प्रदेशच्या पोलिसांमध्ये घमासान झाले. जवळपास २० तास शिमला पोलिसांकडून दिल्ली व हरियाणातील पोलिसांना रोखल्याची घटना घडली आहे. पोलिसांमध्ये सुरू असलेल्या या लपंडावाची चर्चा सर्वत्र होत आहे.

बुधवारी सकाळी सुरू झालेला हा वाद गुरूवारी सकाळपर्यंत सुरू होता. काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी आलेल्या दिल्ली व हरियाणा पोलिसांच्या टीमवर चिडगांव पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिमला पोलिसांनी गुरूवारी सकाळी याबाबत प्रसिध्दीपत्रक जारी करत घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली आहे.

Youth Congress protest AI summit
Supreme Court : मोठी घडामोड : मोदी सरकारची सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी, ‘त्या’ दोन व्यक्ती मंत्रालयात कधीच दिसणार नाहीत...

प्रसिध्दीपत्रकानुसार, बुधवारी सकाळी शिमला पोलिसांना चिडगांवमधील चांशुल रिसॉर्टच्या मालकाने माहिती दिली की, काही लोक साध्या वेशभुषेत, हिमाचल प्रदेशाबाहेरील नंबर असलेल्या गाड्यांमध्ये आले होते. ते तीन लोकांना घेऊन आपल्यासोबत गेल्याचे मालकाने सांगितले. या लोकांनी काही इलेक्ट्रॉनिक सामान, डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डरही सोबत नेले.

रिसॉर्ट मालकाने माहिती दिल्यानंतर शिमला पोलिसांनी तातडीने कायदेशीर कारवाई सुरू केली. या घटनेतील तथ्य जाणून घेण्यासाठी आणि सर्व प्रक्रिया कायदेशीर गोष्टींचे पालन करून होईल, यासाठी पावले उचलण्यात आल्याचे शिमला पोलिसांनी सांगितले. सोलन पोलिसांसोबत समन्वय साधत शिमला पोलिसांच्या टीमने संबंधित लोकांना शोगी, आयएसबीटी शिमला आणि धर्मपूर येथे थांबविले, अशी माहिती शिमला पोलिसांनी दिली.

Youth Congress protest AI summit
India vs Pakistan : IMF च्या भिकेपेक्षा काश्मीरचे बजेट दुप्पट, PoK सोडा! भारतीय महिला अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला धू धू धुतले…

तपासादरम्यान असे निदर्शनास आले की, संबंधित लोक दिल्ली आणि हरियाणा पोलिस दलातील कर्मचारी होते. त्यांनी दिल्लीत दाखल एका गुन्ह्याशी संबंधित तीन व्यक्तींचा पाठलाग करून कथितपणे ताब्यात घेतले होते. सर्व तीन संबंधित व्यक्तींच्या अधिकारांची सुरक्षा आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यासाठी शिमला पोलिसांनी त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर केले होते. शिमला येथे वैद्यकीय तपासणीही केली, असे शिमला पोलिसांनी सांगितले.

स्थानिक कोर्टाने पोलिसांना संबंधित आरोपींची १८ तासांचा ट्रान्झिट रिमांड दिला होता. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना दिल्लीला जाण्याची परवानगी देण्यात आली. चिडगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रोहडू पोलिसांनी दिल्ली पोलिसांवर बीएनएसनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली पोलिसांनी आरोपांना अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही, असा दावा शिमला पोलिसांनी केला आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या तिघांमध्ये उत्तर प्रदेशातील सौरभ सिंह व अरबाज खान तर मध्य प्रदेशातील सिध्दार्थ अवधूत यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com