MLA Resignation : पदाचा राजीनामा देत पक्ष सोडणारे सहा आमदार फसणार? निवडणूक आयोगाकडे धाव घेत पक्षानेच केली कोंडी

AIADMK news, 6 MLAs resignation, Election Commission India : अण्णाद्रमुक पक्षाने आयोगाकडे तक्रार करत सहा माजी आमदारांना अडचणीत आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग याबाबतीत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
Election Commission
Election Commission Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Tamil Nadu politics : तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि सुपरस्टार विजय यांचा टीव्हीके पक्ष सत्तेत आला. सत्तास्थापनेवेळी झालेल्या राजकारणानंतर विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुक पक्षात सध्या बंडाचे वारे वाहत आहेत. यापूर्वीच सुमारे २५ हून अधिक आमदारांनी मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावावेळी पाठिंबा दिला आहे.

सत्तास्थापनेनंतर अण्णाद्रमुकच्या सहा आमदारांनी तकडाफडकी राजीनामे दिले आहे. पक्षातील आणखी काही आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. एकीकडे या चर्चा सुरू असतानाच या रिक्त जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर एआयएडीएमके पक्षाने तातडीने आयोगाकडे धाव घेतली.

पक्षाचे खासदार आय. एस. इन्बादुराई यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तमिळनाडूमध्ये घोडेबाजार सुरू असल्याने खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यानुसार आम्ही २०२६ च्या निवडणुकीवेळी जिंकलेल्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करू नये, अशी मागणी केली आहे.

Election Commission
Modi cabinet reshuffle : एकाचवेळी 12 केंद्रीय मंत्र्यांना सोडावे लागले पद, 43 जणांना शपथ; मोदी सरकार 2.0 च्या सर्वात मोठ्या फेरबदलाची कहाणी

सहा आमदारांनी स्वेच्छेने पदाचा राजीनामा दिला आहे. ते असंविधानिक पध्दतीने टीव्हीके पक्षात गेले आहेत. त्याआधीच आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे त्यांना अपात्र करण्यासाठी तक्रार दिली आहे. मद्रास हायकोर्टातही स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत पोटनिवडणूक जाहीर करू नये, अशी मागणी आयोगाकडे केल्याचे इन्बादुराई यांनी सांगितले.

Election Commission
भाजप नेत्याला भिडणं 'या' IAS अधिकाऱ्याला पडलं महागात

अण्णाद्रमुक पक्षाने आयोगाकडे तक्रार करत सहा माजी आमदारांना अडचणीत आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग याबाबतीत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केल्यास त्याचा थेट फायदा टीव्हीकेला होणार आहे. या जागांवर संबंधित आमदार टीव्हीकेच्या चिन्हावर उमेदवार असतील. सध्याची राजकीय स्थिती पाहता ते सहाही जण पुन्हा निवडून येऊ शकतात. असे झाल्यास टीव्हीकेची विधानसभेतील ताकद वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com