PM Modi waits for NEET students : ‘नीट’ फेरपरीक्षेदिवशी पंतप्रधानांची मोठी कृती! नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांसाठी घेतला असा निर्णय की चर्चांना उधाण

PM Narendra Modi waits Delhi Airport hour to ensure NEET students face no traffic disruption amid nationwide paper leak controversy : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात राजकीय वातावरण तापले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक अशी कृती केली, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi NEET Exam News : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात राजकीय वातावरण तापले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक अशी कृती केली, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

‘नीट’ फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मोदी तब्बल एक तास दिल्ली विमानतळावरच थांबून राहिल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरण मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू असून काँग्रेस (Congress) नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी आतापर्यंत देशात झालेल्या पेपरफुटींची यादीच जाहीर करत सरकारला लक्ष्य केले आहे. दुसरीकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी या वादावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र रविवारी त्यांच्या एका निर्णयामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले. रविवारी देशभरात ‘नीट’ची फेरपरीक्षा दुपारी 2 वाजता सुरू होणार होती. त्याच दिवशी पश्चिम बंगाल दौऱ्यावरून परतल्यानंतर मोदी यांचे विमान दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी दिल्ली विमानतळावर उतरले.

PM Narendra Modi
Latur NEET student suicide : NEET पेपरफुटीने घेतला आणखी एक जीव? लातूरमध्ये विद्यार्थिनीनं जीवन संपवलं, देशभरात संतापाची लाट

सूत्रांच्या माहितीनुसार, त्या वेळी पंतप्रधानांचा ताफा विमानतळाबाहेर पडला असता तर दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला असता आणि अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास अडथळे निर्माण होऊ शकले असते. याच पार्श्वभूमीवर मोदी यांनी दोन वाजेपर्यंत विमानतळावरच थांबण्याचा निर्णय घेतला.

PM Narendra Modi
Indian Navy New Warships : ‘दुनागिरी’, ‘संशोधक’ आणि ‘अग्रय’ युद्धनौकांचं वैशिष्ट; नौदलाला ‘आत्मनिर्भर भारत’ची जोड!

देशाचे नागरिक प्रथम; मोदींचे कौतुक

विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मोदींच्या या निर्णयानंतर केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनी त्यांचे कौतुक करत, देशाचे नागरिक प्रथम, हा संदेश मोदींनी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिला, अशी प्रतिक्रिया दिली.

22.79 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून वादात अडकलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आयोजित नीट परीक्षा रविवारी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. देशातील 551 परीक्षा केंद्रे आणि विदेशातील 14 केंद्रांवर तब्बल 22.79 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

अभूतपूर्व बंदोबस्तात झाली परीक्षा

मे महिन्यात झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने सरकार आणि NTA दोघांनाही मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे फेरपरीक्षा घेण्याची वेळ आली. दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत परीक्षा झाली. सर्व केंद्रांवर मेटल डिटेक्टर तपासणी, बायोमेट्रिक पडताळणी, सीसीटीव्ही देखरेख, 48 हजार तपासणी कर्मचारी, हजारो निरीक्षक आणि 2 लाखांहून अधिक सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.

मोदींच्या कृतीमुळे राजकीय चर्चांना नवा आयाम

परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी यावेळची भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका अपेक्षेपेक्षा अधिक कठीण असल्याची प्रतिक्रिया दिली. एकीकडे NEET पेपरफुटीवरून विरोधक सरकारला घेरत आहेत, तर दुसरीकडे मोदींच्या या कृतीमुळे राजकीय चर्चांना नवा आयाम मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com