AIMIM Row : वादग्रस्त व्हिडिओनंतर ओवेसींची आमदारावर कारवाई, हकालपट्टी करत दिले आदेश; पण आमदारानेच उभं केलं नवं आव्हान

Asaduddin Owaisi expels AIMIM MLA : AIMIM पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशालाच थेट त्यांच्याच पक्षातील आमदाराने केराची टोपली दाखवली आहे. यामुळे तेलंगणात राजकीय खळबळ उडाली असून नवी राजकीय लढाई पाहायला मिळत आहे.
AIMIM MLA Controversy; Asaduddin Owaisi And MLA Mirza Rahmat Baig
AIMIM MLA Controversy; Asaduddin Owaisi And MLA Mirza Rahmat Baigsarkarnama
Published on
Updated on

AIMIM MLA Controversy News : AIMIM पक्षाने तेलंगणात आपल्याच पक्षाच्या विधान परिषद सदस्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. ही कारवाई वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात करण्यात आली असून, मिर्झा रहमत बेग असे आमदाराचे नाव आहे. तर, पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बेग यांना विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. तथापि, बेग यांनी ओवेसी यांच्या आदेशालाच थेट आव्हान देत राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या राजकीय घडामोडींमुळे तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या राजकीय लढाईला तोंड फुटले आहे.

एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप बेग यांच्यावर केला जात आहे. याबाबत भाजपने कठोर कारवाई आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करत आवाज उठवला आहे. तेलंगणा भाजपचे अध्यक्ष एन. रामचंद्र राव यांनीदेखील यावरून टीका केली होती. त्यांनी बेग यांच्यावरील आरोप एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. हे प्रकरण आधीच समोर आले होते. यामुळे फक्त त्यांची पक्षातून हकालपट्टी होणे, त्यांना पक्षातून काढून टाकणे म्हणजे कारवाई झाली असे होत नाही. हा प्रकार म्हणजे हात झटकण्यासारखा असल्याचेही राव यांनी म्हटले होते.

तर, या टीकेच्या आधीच एआयएमआयएमचे सहसचिव एस. ए. हुसेन अन्वर यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत, मिर्झा रहमत बेग यांना पक्षातून तात्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आले आहे. तर, विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे त्यांनी आपला राजीनामा द्यावा, असे स्पष्ट आदेश पक्षाध्यक्षांनी दिल्याचे म्हटले होते. पण, ही कारवाई का केली, याबाबत पक्षाने कारण दिलेले नव्हते.

AIMIM MLA Controversy; Asaduddin Owaisi And MLA Mirza Rahmat Baig
AIMIM News : निदा खानला आश्रय देणं भोवलं! नगरसेवक मतीन पटेल पोलिसांच्या ताब्यात, नेमकं काय घडलं?

दरम्यान, आमदार बेग यांनी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतरही विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे बेग यांनी पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशालाच थेट आव्हान दिल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

तर, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका वादग्रस्त व्हिडिओनंतर ओवेसी यांनी बेग यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करत, राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. पण, आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत असून, हैदराबादच्या अत्तापूर परिसरात काही स्थानिक तरुणांनी बेग यांचा व्हिडिओ तयार केल्याचा आरोप केला जात आहे.

AIMIM MLA Controversy; Asaduddin Owaisi And MLA Mirza Rahmat Baig
AIMIM Corporator Attack : AIMIM नगरसेवकाला 15 ते 16 जणांनी घेरत जीवघेणा हल्ला; अझहर शेख यांचा 'मला संपवण्याचा कट होता' काँग्रेसवर गंभीर आरोप

दरम्यान, बेग यांनी २७ ऑगस्ट रोजी येथील सायबर गुन्हे पोलिसांकडे या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. ज्यात त्यांनी आरोप केला आहे की, काही अज्ञात व्यक्तींनी अलीकडेच त्यांना फोन करून पैशांची मागणी केली होती. त्यांनी त्यांचे बनावट व्हिडिओ व मॉर्फ केलेले फोटो प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com