UPSC New Chairman: PM मोदींचा प्रचंड विश्वास असलेल्या अन् 'अग्निवीर' योजनेचे निर्माते अजय कुमार यांना केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी

Ajay Kumar : केंद्र सरकारनं अजय कुमार यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे. आता देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा घेणाऱ्या यूपीएससीचा कार्यभार ते सांभाळणार आहेत.
UPSC Ajay Kumar  .jpg
UPSC Ajay Kumar .jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध एकीकडे ताणले गेले आहेत. यातच केंद्र सरकारकडून मोठी पावलं उचलली जात आहेत. अशातच यूपीएससीबाबतही सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यूपीएससीच्या (UPSC) अध्यक्षपदी अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी केंद्रीय सचिव अजय कुमार यांची यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजय कुमार यांना सुमारे अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2027 संपणार आहेत. ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू (Droupadi Murmu) यांच्या सहीने करण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेचे कलम 316(2) आणि यूपीएससी मेम्बर्स रेग्युलेशन 1969 या कायद्यातंर्गत ही यूपीएससीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. क्रेंद्र सरकारनं अजय कुमार यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे. आता देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा घेणाऱ्या यूपीएससीचा कार्यभार ते सांभाळणार आहेत.

UPSC Ajay Kumar  .jpg
Devendra Fadnavis booster : फडणवीसांच्या मनातील 'बुस्टर' कोण? पवार-पाटील की ठाकरे?

अजय कुमार हे 1985 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांना 40 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव राहिला आहे. यापूर्वी प्रीती सुदन यांच्याकड् यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार होतता, त्यांचा कार्यकाळ 29 एप्रिल रोजी संपुष्टात आला होता.

डॉ.अजय कुमार हे केरळमधून येतात.तसेच त्यांची प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली. संरक्षण विभागाच्या सचिवपदी,त्यांनी जिल्हाधिकारी,आयटी विभागात प्रधान सचिव,इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवपद,राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रात महानिर्देशक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. अजय कुमार हे 23 ऑगस्ट 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत संरक्षण विभागाच्या सचिवपदी कार्यरत होते.

UPSC Ajay Kumar  .jpg
Kolhapur Politics: महाडिकांची ताराराणी आघाडी अन् सतेज पाटलांच्या काँग्रेसला हादरे; कारभाऱ्यांच्या सोडचिठ्ठीनं नेमकं काय होणार?

अजय कुमार यांनी आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी,अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातून अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडी मिळवली आहे. तसेच ते इंडियन नॅशनल अकादमी ऑफ इंजिनिअर्सचे फेलो देखील राहिले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे अजय कुमार यांच्याच कार्यकाळात देशानं संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली. तसेच अग्निवीर योजना सुरू करण्यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलं आहे.

प्रीती सुदान यांचा कार्यकाळ संपला अजय कुमार यांची नियुक्ती प्रीती सुदान यांचा कार्यकाळ संपल्यानंतर झाली आहे. तत्कालीन अध्यक्ष मनोज सोनी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर जुलै 2024 मध्ये माजी आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 29 एप्रिल रोजी संपला.

UPSC Ajay Kumar  .jpg
BJP Vs Congress : सुनील केदार अन् काँग्रेसचा 5 वर्षात टप्प्यात आणून कार्यक्रम; नागपूर जिल्हा परिषद यंदा भाजप काबीज करणार?

मनोज सोनी जून 2017 ते मे 2023 पर्यंत यूपीएससीचे सदस्य होते. अध्यक्ष झाल्यानंतर लगेचच जून 2024 च्या सुरुवातीला त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला. विरोधी पक्षांनी सोनी यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेत्यांनी सोनी यांच्या राजीनाम्यामागील कारण सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी केली. सोनी यांचा राजीनामा यूपीएससीशी संबंधित कथित "घोटाळ्यांशी" संबंधित आहे का? असा तिखट सवालही खर्गे यांनी केंद्र सरकारला केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com