
Kolhapur News: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि शिवसेना, राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदललेली आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवारांचा सुफडासाफ झाल्याने कारभाऱ्यांना राजकीय भवितव्याची चिंता लागली आहे.
अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांनी महायुती मधील सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर सत्तेतील महाडिक गटाची असणारी ताराराणी आघाडीतील गटनेते सत्यजित कदम देखील विधानसभा निवडणुकीत शिंदे गटात गेल्याने त्याचा फटका महापालिका निवडणुकीत बसणार आहे.
काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम या कारभाऱ्यांनीच पक्ष सोडत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, आणि महाडिक गटाने ताराराणी आघाडीला धक्का दिला आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम हे विधानसभा निवडणुकी शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले. तर काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख हे देखील शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. एकेकाळी कोल्हापूर महानगरपालिकेवर ताराराणी आघाडीचा झेंडा फडकवणाऱ्या महाडिक गटाला मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्या सलग प्रयत्नाने हादरा दिला. पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली तरी सत्ताधाऱ्यांमधील तसेच विरोधकांमध्येही गटातटाचे राजकारण सुरूच राहिले. त्या-त्या कारभाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या पदरात पदे, निधी पडावा यासाठी कारभाऱ्यांना धरून राहणारे नगरसेवक तयार झाले.
नंतरच्या काळात भाजप पक्षात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर मागील महानगरपालिका निवडणूक ताराराणी आघाडीने भाजप सोबत लढली. त्यावेळी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम होते. तर दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेत माजी स्थायी समिती सभापती आणि काँग्रेसची गटनेते शारंगधर देशमुख यांचाही काँग्रेसकडील एक गट तयार झाला. त्याच पद्धतीने भाजप-ताराराणी आघाडीमध्येही एक झाला. त्यांचे नेतृत्व तेथील कारभाऱ्याच्या हातात गेले.
आलेल्या संधीचं सोनं करत कारभाऱ्यांनाही आपले स्थान बळकट करण्यासाठी काही नगरसेवकांना सोबत घ्यावे लागले. त्यातून गेल्या सभागृहात पक्षांची ध्येयधोरणे राबवली जात असली तरी या गटातील कारभारी, त्यांचे जवळचे नगरसेवक यांना विविध कामांत साहाय्यभूत ठरेल, अशा भूमिका घेतल्या गेल्या.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या दोन्ही गटांच्या जोरावरच कारभाऱ्यांनी हालचाली केल्या. मात्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची मागणी करून ही काँग्रेसच्या यांना डावलण्यात आले. दुसरीकडे भाजप ताराराणीच्या कदम यांच्या उमेदवारी बाबत भाजपमध्येच अंतर्गत गेम झाला. त्यानंतर नाराज झालेल्या कदम यांनी शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश केला. तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळालेले देशमुख देखील काँग्रेसवर नाराज आहेत.
दरम्यान ताराराणी आघाडी आणि काँग्रेसचे दोन प्रमुख शिलेदारच स्वतःच्या गटात नसल्याने दोघांनीही आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. काँग्रेसमधील या गटातील सहकारी एकत्र असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला; पण ही निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार असल्याने पक्षाचा हात आवश्यक आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश आल्यानंतर त्या गटातील बहुतांश जण उपस्थित राहिले. आजवरच्या महापालिकेतील राजकारणाचा इतिहास पाहिल्यानंतर ही भूमिका निवडणुकीच्या तोंडावर बदलण्याची दाट शक्यता आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.