Ajit Pawar Plane crash : अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ; संसदेत खासदारांनी वेधले ‘त्या’ मुद्याकडे लक्ष, मंत्र्यांचे लगेच उत्तर

Manoj kumar Jha Rajya Sabha speech : मनोज झा यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे.
Ajit Pawar Plane Crash Investigation
Ajit Pawar Plane Crash InvestigationSarkarnama
Published on
Updated on

Plane crash investigation : दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झाला. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार प्रा. मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अपघाताचा मुद्दा मांडत महत्वपूर्ण मागणी केली आहे. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनीही उत्तर दिले.

मागील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेत संसदेत विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली आहे. रोहित पवार हे मनोज कुमार झा यांनाही भेटले होते. या भेटीगाठीनंतर पहिल्यांदाच गुरूवारी संसदेत हा मुद्दा मांडण्यात आला.

मनोज झा यांनी प्रश्न उपस्थित केला की, अलीकडे देशात अहमदाबाद–लंडन विमान अपघात, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात अशा काही दुर्घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकरणांभोवती गूढ निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर पायलट्स असोसिएशनने संपूर्ण प्रकरणाची एका विशिष्ट Schedule (नियम) द्वारे सखोल चौकशी करावी, अशी मागणी झा यांनी राज्यसभेत केली. त्यावर केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी याबाबत आंतराष्ट्रीय निकष आणि प्रोटोकॉलनुसारच चौकशी सुरू असल्याचे उत्तर दिले. AAIB च्या लॅबमध्येच अपघाताचा सर्व डेटा रिकव्हर केला जात असून ही यंत्रणा अधिक सक्षम केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Ajit Pawar Plane Crash Investigation
Parliament Security : संसदेच्या आवारात वाहनाची घुसखोरी, सायरन वाजले अन् एकच धावपळ..! नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

झा यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रा. मनोज झा यांना गेल्या आठवड्यात भेटून अजितदादांच्या अपघाताच्या पारदर्शक चौकशीसंदर्भात संसदेच्या अधिवेशनात मागणी करण्याची विनंती केली होती. आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा मांडून वेगळ्या शेड्युल (Rule १२) अंतर्गत तपासाची मागणी केली.

Ajit Pawar Plane Crash Investigation
Rajya Sabha Election : ‘एनडीए’त फूट? राज्यसभेच्या मतदानावेळीच केंद्रीय मंत्र्यांची सून आईसह विरोधी पक्षनेत्यांकडे, दोघीही आमदार

मंत्र्यांनी उत्तर देताना मात्र ठोस उत्तर न देता केवळ थातुरमातुर उत्तर देण्याचे काम केले. आम्ही AAIB नियम 11 ऐवजी नियम 12 द्वारे चौकशीच्या करत असलेल्या मागणीला मंत्र्यांनी जाणीवपूर्वक बगल देण्याचे काम केले, हे अत्यंत दुर्देवी आहे. खासदार सुप्रियाताई तसेच INDIA आघाडीच्या माध्यमातून या आठवड्यात संसदेत अजितदादांच्या विषयावर विस्तृत चर्चा होईलच. शिवाय राज्याच्या विधानसभेत देखील विस्तृत चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही रोहित पवारांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com