

Delhi Parliament security news : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सोमवारी दुपारी आवारात सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. मागील काही दिवसांपासून विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागत होते. आज लोकसभेसह राज्यसभेचे कामकाजही सुरळीत सुरू असतानाच विनापास एक चारचाकी वाहन संसदेच्या आवारात घुसल्याने खळबळ उडाली.
संसदेच्या आवारात आवश्यक सुरक्षा पासशिवाय कोणतेही वाहन सोडले जात नाही. पण दुपारी एक वाहन संसदेच्या आवारात घुसल्याने सुरक्षा सायरनही जोरजोरात वाडू लागले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रोटोकॉलनुसार सिक्युरिटी अलर्ट जारी करण्यात आला आणि यंत्रणा सज्ज झाल्या.
नेमकं काय घडल?
संसद भवनाच्या विजय चौक येथील प्रवेशद्वारातून एक पास नसलेले वाहन परिसरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षा प्रणालीला वाहनाला पास नसल्याचे लक्षात आल्याने लगेच सायरन वाजू लागले. त्यानंतर तातडीने सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. वाहनाला रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली. प्रवेशद्वारावरच संबंधित वाहनाला रोखण्यात आले. तपास यंत्रणांकडून पुढील तपास केला जात आहे.
सुरक्षा पास नव्हता
संसदेच्या परिसरात येण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही पास संबंधित वाहनावर लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे हे वाहन थेट मुख्य प्रवेशद्वारापर्यंत कसे आले, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
बुम बॅरिअर कोसळले
प्रवेशद्वारावरील बुम बॅरिअर कोसळल्याने सिक्युरिटी सायरन वाजल्याचा दावाही केला जात आहे. बुम बॅरिअर जोराच्या वाऱ्यामुळे कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, याबाबत सुरक्षा यंत्रणांकडून माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे संसदेच्या आवारात विनापास आलेले वाहन नेमके कुणाचे होते, सायरन नेमका कोणत्या कारणामुळे वाजला, संसदेच्या सुरक्षा कशी भेदण्यात आली, असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.