Rajya Sabha Election : ‘एनडीए’त फूट? राज्यसभेच्या मतदानावेळीच केंद्रीय मंत्र्यांची सून आईसह विरोधी पक्षनेत्यांकडे, दोघीही आमदार

Bihar Rajya Sabha election news : बिहारमध्ये पाच जागांसाठी दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. एकूण २४३ आमदार असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हेही रिंगणात आहेत.
Rajya Sabha Election
Rajya Sabha Election Sarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha voting update : देशात राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बिहारसह हरियाणा आणि ओडिशा या तीन राज्यांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत आमदारांना मतदान करता येणार आहे. तीनही राज्यांत सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यातही सर्वांचा नजरा बिहारच्या मतदानावर खिळल्या आहे.

इंडिया आघाडीतील आमदार मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग करणार असल्याचा दावा एनडीएच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच दुसरीकडे एनडीएचे टेन्शन वाढविणारे वृत्त समोर आले आहे. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या HAM पक्षाचे प्रमुख व केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या सून दीपा या आई ज्योती मांझी यांच्यासह विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना भेटल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे दीपा मांझी आणि ज्योती मांझी या दोघीही आमदार आहेत. त्यामुळे एकीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी एक-एका आमदाराची जुळवाजुळव सुरू असताना या दोघी यादव यांना भेटल्याने चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभा निवडणुकीत आरजेडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी तेजस्वी यादव यांच्याकडून आमदारांची समीकरण जुळवून आणले जात आहे.

Rajya Sabha Election
Assembly Election update : आचारसंहिता लागू होताच निवडणूक आयोगाचा ममता बॅनर्जींना मोठा झटका; संसदेतही उमटले पडसाद

इंडिया आघाडीला विजयासाठी आणखी सहा आमदारांची गरज आहे. एमआयएमचे पाच आणि बसपाच्या एका आमदाराने आज सकाळीच आरजेडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर काही वेळातच एनडीएतील आमदार दीपा व आमदार ज्योती मांझी या तेजस्वी यादव यांच्या दालनातून बाहेर पडताना दिसून आल्या. त्या काही मिनिटे यादव यांच्या दालनात उपस्थित होत्या.

दरम्यान, HAM पक्षाच्या नेत्यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहे. दीपा मांझी आणि ज्योती मांझी चुकून तेजस्वी यादव यांच्या दालनात गेल्या होत्या. ही चूक लक्षात आल्यानंतर त्या लगेच बाहेर आल्या. एनडीएच्या सर्व आमदारांनी पक्षाच्या उमेदवारांनाच मतदान केल्याचा दावाही नेत्यांनी केला आहे.

Rajya Sabha Election
BJP operation Lotus : भाजपच्या ऑपरेशन लोटसला धक्का! दाव लावलेले तिन्ही मोठे मोहरे पहिल्याच परीक्षेत फेल...

बिहारमध्ये पाच जागांसाठी दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. एकूण २४३ आमदार असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हेही रिंगणात आहेत. प्रामुख्याने एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाह आणि आरजेडीचे उमेदवार केएडी सिंह यांच्यात थेट लढत होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com