भाजपचं मंत्रिमंडळ कोट्यधीशांचं अन् सर्वांत श्रीमंत बाबूश मोन्सेरात; चौघांवर फौजदारी गुन्हेही

गोव्यात पुन्हा एकदा भाजपने सत्ता स्थापन केली असून, मुख्यमंत्रिपदाची माळ प्रमोद सावंत यांच्या गळ्यात पडली आहे.
Narendra Modi and Pramod Sawant
Narendra Modi and Pramod Sawant Sarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात भाजपने (BJP) सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सावंत यांच्यासह एकूण 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यातील सर्वच जण हे कोट्यधीश आहेत. त्यातील चौघांवर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने या मंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ही माहिती जाहीर केली आहे. एडीआरने म्हटले आहे की, गोव्यातील नव्या मंत्रिमंडळातील 44 टक्के मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्धचे फौजदारी खटले घोषित केले आहेत. त्यातील तीन मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. सर्वच मंत्री कोट्यधीश असून, या नऊ मंत्र्यांची सरासरी संपत्ती 19.49 कोटी रुपयांची आहे. पणजी मतदारसंघातील बाबूश मोन्सेरात हे सर्वाधिक संपत्ती जाहीर करणारे मंत्री आहेत. त्यांची संपत्ती 48.48 कोटी रुपये आहे. प्रियोळ मतदारसंघातील गोविंद गावडे यांच्याकडे सर्वांत कमी म्हणजेच 2.67 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Narendra Modi and Pramod Sawant
निवडणूक आयोगाचा दणका! सत्ताधारी आमदार आला अडचणीत

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या गळ्यात टाकली आहे. सावंत यांच्यासोबत 8 मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. यात विश्वजीत राणे (Vishwajit Rane), मॉविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र भाजपकडून यात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. गोव्याच्या मंत्रिमंडळाची क्षमता 11 आहे. मंत्रिमंडळात अजून 3 जागा शिल्लक आहेत. यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) आणि अपक्षांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मगोपच्या सुदिन ढवळीकरांसह अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

Narendra Modi and Pramod Sawant
वाहनचालकांना दणका! पेट्रोल, डिझेल 9 दिवसांत 8 वेळा महागलं

भाजपने गोव्यात 20 जागा मिळवत पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला होता. काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना डच्चू मिळण्याची चर्चा सुरू होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट त्यांनी घेतली अन् मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा सावंत यांच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय भाजपने घेतला. सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा गोव्यात भाजपचे सरकार स्थापन झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com