Jalna News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभ्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. मला माझ्या रानाचा बांध कुठे आहे, हेसुद्धा माहिती नाही. माझा बाप कष्ट करतो आणि आम्हाला खाऊ घालतो आणि हा पठ्ठ्या त्यांनी केलेल्या कष्टावर खाऊन समाजाचे काम करतोय. एक जण जरी म्हणाला की, मी तुला एक रुपया फिरायला दिला, तर त्याच दिवशी मी आत्महत्या करेन, असे जाहीर आव्हान मनोज जरांगे यांनी दिले. (...then on the same day I will self harm : Manoj Jarange)
मराठा आरक्षणासाठी गेली १७ दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत घेऊन आपले आंदोलन मागे घेतले. जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.
जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी आम्ही सरकारला दिलेल्या वेळेवर ठाम आहोत. आम्ही मोठ्या मनाने तो दिलेला आहे. समाजाच्या वतीने सरकारला आणखी दहा दिवस वाढवून देतो. पण, आम्हाला आरक्षण द्या. दुसरी कोणतीही अपेक्षा मराठा समाजाला नाही.
आतापर्यंत उपोषणस्थळी तब्बल १७ लाखांपेक्षा जास्त लोक येऊन गेले असतील, असा दावाही जरांगे यांनी केला आहे. सगळ्यांचं एक म्हणणं आलं. जरांगे पाटील तुम्ही सरकारला वेळ द्या, काहीही करा, पण समाजाला आरक्षण मिळवून द्या. त्याप्रमाणे माझा जीव गेला तरी चालेल; पण तुमच्या पोरांच्या पदरात आरक्षण टाकेन, तेव्हाच मी थांबेन; अन्यथा थांबणार नाही, असा शब्द मी मराठा समाजाला दिला आहे. चिठ्ठ्या अन् पाट्यांचे धंदे आम्ही करणार का, असे त्यांनी नमूद केले.
मनोज जरांगे म्हणाले की, उभ्या आयुष्याची राखरांगोळी आम्ही केली आहे. मला माझ्या रानाचा बांध कुठे आहे, हेसुद्धा माहिती नाही. एवढं समाजासाठी रात्रंदिवस करत आहे. योगायोगाने माझा बाप येथे आला; म्हणून पण मी माझं मोठंपण म्हणून सांगत नाही. माझा बाप कष्ट करतो आणि आम्हाला खाऊ घालतो आणि हा पठ्ठ्या त्यांनी केलेल्या कष्टावर खाऊन समाजाचे काम करतोय. एक जण जरी म्हणाला की, मी तुला एक रुपया फिरायला दिला, तर त्याच दिवशी मी आत्महत्या करेन.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.