कॅप्टन अमरिंदरसिंग हॉकी स्टिकने आणणार काँग्रेसला जेरीस!

पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) विरोधात शड्डू ठोकला आहे.
Amarinder Singh
Amarinder Singh Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) विरोधात शड्डू ठोकला आहे. त्यांनी पंजाब लोक काँग्रेस (Punjab Lok Congress) हा नवीन पक्ष स्थापन केला आहे. राज्यात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपसोबत (BJP) त्यांचा पक्ष मैदानात उतरला आहे. आता या पक्षाला निवडणूक आयोगाने हॉकी स्टिक आणि बॉलचे चिन्ह मिळाले आहे.

कॅप्टन यांनी नवीन पक्षाचे नाव पंजाब लोक काँग्रेस, असे जाहीर केले होते. त्यांनी नावात काँग्रेसचा वापर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता त्यांना हॉकी स्टिकसह बॉलचे चिन्ह मिळाले आहे. पंजाबमधील हॉकीच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना काही प्रमाणात होऊ शकतो. अमरिंदरसिंग यांचे काँग्रेसमधील अनेक समर्थक काही माजी मंत्री व विद्यमान आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमरिंदरसिंग काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये येणार असल्याने टप्प्याटप्याने हे प्रवेश होणार आहेत.

Amarinder Singh
अपक्ष आमदाराने भाजपला ऐनवेळी दाखवला ठेंगा!

अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजपविरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. पण आता कायदे मागे घेण्यात आल्याने तसेच अमरिंदरसिंग भाजपसोबत गेल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्याविषयी काही गट नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी निवडणूक काँग्रेससाठी कठीण असल्याचे संकेत मिळत आहेत.

Amarinder Singh
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण देशाला होतोय असाही फायदा!

दरम्यान, 2017 मध्ये झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसने 117 पैकी 77 जागा मिळवत अकाली दल व भाजप आघाडीकडून सत्ता काबीज केली होती. हे दोन पक्ष सलग दहा वर्षे सत्तेत होते. या निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP) 20 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तर अकाली दलाला 15 आणि भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com