

Panjab Politics : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. ते दिल्ली दौऱ्यावर असताना भाजपला पंजाब समजत नाही. पंजाबविषयी अनुभव असलेल्या व्यक्तींसोबत ते चर्चा करत नाही. मी दोन वेळा मुख्यमंत्री होतो, तीन वेळा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. सहा वेळा आमदार होतो, खासदार होतो. मात्र, पंजाब संबंधित विषयांशी भाजप आपला सल्ला घेत नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप स्वबळावर पंजाबमध्ये सत्तेत येऊ शकत नाही. सत्तेत यायचे असेल तर अकाली दलासोबत आघाडी आवश्यक आहे. अकालीसोबत आघाडी करूनच भाजप पंजाबमध्ये सत्तेत यापूर्वी राहिली आहे.
पत्रकारांनी त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याविषयी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, मागील पाच वर्षांपासून त्यांचे राहुल गांधी, प्रियंका गांधी अथवा सोनिया गांधी यांच्याशी कोणतेही बोलणे झालेले नाही. मदतीसाठी फोन केला तर ते मदत करतील. मात्र, वैयक्तीक संबंध वेगळे असतात राजकारण वेगळे असते. ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत.
2027 मध्ये पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकीमध्ये नेमके कोण सत्तेत येईल, याविषयी त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, सत्तेत कोण येणार हे लगेच सांगणे अवघड आहे. अजून बराच काळ आहे. पंजाबचे राजकारण विभागलेले आहे. अकाली दलात अंतर्गत गट आहेत. तर, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहेत. भाजपकडे पुरेशी जनधारा नाही. राजकारण हे वेगाने बदलत असते त्यामुळे 2027 मध्ये नेमके काय होईल, हे आत्ता सांगणे कठीण आहे, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.