Amit Shah : मातृभाषेतून उच्च शिक्षण दिल्यास, २५ वर्षात भारत जगात पहिल्या क्रमांकावर : शाह यांना विश्वास!

Amit Shah : “गुजराती, तेलगू, उडिया, पंजाबी आणि बांगला – या सर्व भाषांमध्ये उच्च आणि वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम सुरू होतील.
Amit Shaha
Amit ShahaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Amit Shah News : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्याच मातृभाषेतून शिक्षण दिल्यास त्यांची वैचारिक, तार्किक, विश्लेषणात्मक आणि संशोधन क्षमता वाढेल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडले. महेसाणा येथील शेठ जी. सी. हायस्कूलच्या 95 व्या वर्धापनदिनानिमित्त मेळाव्याला संबोधित करताना शाह बोलत होते.

Amit Shaha
Jaykumar Gore Accident : गंभीर अपघातनंतरही गोरेंनी सहकाऱ्यांना सावरले अन् पहिला फोन या नेत्याला...

शाह म्हणाले, तांत्रिक-वैद्यकीय आणि उच्च शिक्षण अभ्यासक्रमांचे विषय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्याचे काम सुरू आहे. ते म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणमुळे येत्या 25 वर्षांत भारताला प्रथम क्रमांकाचा देश बनवेल. स्वातंत्र्यपूर्व भारतात ब्रिटीशांच्या शैक्षणिक धोरणानुसारच एकसाचीपणाने शिक्षण घेणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण होते. विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची, संशोधन करण्याची, तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची, निर्णय घेण्याची आणि समजून घेण्याची शक्ती विकसित झाली नाही, ज्यामुळे आपल्या समाजात समस्या निर्माण झाल्या.

शाह पुढे म्हणाले, "नवीन शैक्षणिक धोरण, ज्यामध्ये मातृभाषेवर भर देण्यासह मूलभूत बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे 25 वर्षात भारत जगात प्रथम क्रमांकावर येईल." प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शक्य तितक्या मातृभाषेतून शिक्षण देणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. मला खात्री आहे की येत्या पाच-सात वर्षांत देशातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिले जाईल.

Amit Shaha
चंद्रपुरात राजकीय नाट्य : वाट पाहूनही पालकमंत्री पोहचलेच नाहीत, धानोरकर संतापले अन् कुदळ मारून गेले!

यासोबतच तांत्रिक, वैद्यकीय आणि उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम मातृभाषेत अनुवादित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. भोपाळमध्ये पहिल्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमाचे भाषांतर केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण हिंदीत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

“गुजराती, तेलगू, उडिया, पंजाबी आणि बांगला – या सर्व भाषांमध्ये उच्च आणि वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम सुरू होतील. तिथून, भारत संशोधन आणि विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सुरुवात करेल." माणूस आपला मूळ विचार तेव्हाच ठेवू शकतो, जेव्हा त्याला त्याचा विषय मातृभाषेत शिकवला जातो. नवीन शैक्षणिक धोरण कला आणि संगीत इत्यादी विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास मदत करेल, असे शाह म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.