Congress Politics : काँग्रेसचा मोठा निर्णय, निवडणूकीआधीच खेळले 'ब्राम्हण कार्ड', प्रदेशाध्यक्ष बदलला! मुस्लीम-दलित जातीय समीकरणही साधले!

Aradhana Mishra UP Congress : पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत.
Rahul Gandhi | Sonia Gandhi
Rahul Gandhi | Sonia Gandhisarkarnama
Published on: 
Updated on: 

UP Congress : पुढील वर्षी तीन राज्यातील विधानसभा निवडणूका पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठे संघटनात्मक बदल केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये आराधना मिश्रा यांना प्रदेशाध्यक्ष करत 'ब्राम्हण कार्ड' खेळले असल्याची चर्चा आहे.

उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारीपद राजेंद्र पाल यांच्याकडे आहे. ते दलित समुदायातून येतात. तर, कार्यकारी अध्यक्षपद इमरान मसुद यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे ब्राम्हण, दलित, मुस्लिम समीकरण साधत काँग्रेसने मोठा डाव टाकल्याची चर्चा आहे.

आरधना मिश्रा या तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या विधानसभेत विजयी झालेल्या आहेत. रामपुर खास या विधानसभेच्या त्या नेतृत्व करतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा लढत सहा जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे विधानसभेला त्यांची कामगिरी सुधारण्याची त्यांना संधी असल्याचे बोलले जात आहे.

Rahul Gandhi | Sonia Gandhi
Congress News : काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची 'तलवार पुन्हा म्यानात' : विजय वडेट्टीवारांनी अचानक घेतलेल्या यू-टर्नची Inside Story

जातीय समीकरणासमोर आव्हान

80 च्या दशकात ब्राम्हण, दलित, मुस्लिम हे काँग्रेसचे कोअर व्होटर होते. मात्र, पुढे ब्राम्हण मतदार भाजपसोबत, दलित मतदार बसपासोबत तर, मुस्लिम मतदार मुलायसिंग यांच्या समाजवादी पक्षासोबत गेल्याने काँग्रेसकडे कोअर व्होटर शिल्लक राहिला नाही. त्यामुळे पक्षाची जनधारा घटली. आता पुन्हा ब्राम्हण, दलित, मुस्लिम नेत्यांमध्ये महत्त्वाच्या पदे देत आपल्या पूर्वीचा कोअर व्होटर पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे.

Rahul Gandhi | Sonia Gandhi
Congress news : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा पहिला बळी ; खासदाराने सोडलं महत्वाचं पद, पक्षाला धक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com