Congress news : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा पहिला बळी ; खासदाराने सोडलं महत्वाचं पद, पक्षाला धक्का

Punjab Congress, Amarinder Singh Raja Warring resignation : मागील विधानसभा निवडणुकीआधीही कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर चन्नी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. नवज्योत सिंग सिध्दू हे जाहीरपणे पक्षातील नेत्यांबाबत आगपाखड करताना दिसत होते.
Congress
CongressSarkarnama
Published on: 
Updated on: 

Punjab Congress update : मागील काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह सातत्याने चव्हाट्यावर येत होता. अखेर या कलहाने पहिला राजकीय बळी घेतल्याची चर्चा आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अमरिंदर सिंह राजा वारिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी बुधवारी रात्री पक्षाकडे राजीनामा पाठविल्याची आहे. मात्र, अद्याप पक्षाने किंवा वारिंग यांनीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

वारिंग यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे राजीनामा दिला आहे. पुढील काही तासांत काँग्रेसकडून नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली जाऊ शकते. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना पक्षातील कलहाने नेत्यांची डोकेदुखी वाढविली आहे. निवडणुकीच्या काही महिने आधी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ पक्षावर आली आहे.

माजी मुख्यमंत्री व खासदार चरणजीत सिंग चन्नी यांचा वारिंग यांना विरोध होता. काही दिवसांपूर्वीच निवडणुकीच्या अनुषंगाने नेत्यांवर जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले होते. पण वारिंग यांना पदावर कायम ठेवल्याने चन्नी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्याचे पडसाद पक्षसंघटनेवरही पडले होते. त्यामुळे राज्यात पक्षात दोन गट पडल्याचे चित्र होते.

Congress
भाजपला हादरा देणारा विरोधी पक्षाचा उमेदवार; अर्ज दाखल केल्यानंतर काही तासांतच मंत्र्यांसोबत

काँग्रेसने पक्षातील नाराजी दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, दोन गटांमधील दुरावा कमी होऊ शकला नाही. निवडणुकीदरम्यान असेच चित्र दिसू नये, यासाठी अखेर वारिंग यांना राजीनामा देण्याचे आदेश पक्षनेतृत्वाला द्यावे लागल्याची चर्चा आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी, वेणुगोपाल, राज्याचे प्रभारी सचिन पायलट या नेत्यांकडून राज्यातील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. वारिंग यांच्या राजीनाम्यामागे पायलट यांच्याकडून आलेल्या पक्षातील स्थितीचा अहवाल कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

Congress
Someshwar Sugar Election : सोमेश्वरच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोड, विद्यमान अध्यक्षांचेच बंड; राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का

दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीआधीही कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर चन्नी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. नवज्योत सिंग सिध्दू हे जाहीरपणे पक्षातील नेत्यांबाबत आगपाखड करताना दिसत होते. पक्षातील हेवेदावे उघडपणे समोर आल्याने राज्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळीही तीच स्थिती होऊ नये यासाठी पक्षनेतृत्वाने काही महिने आधीच नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com