Arvind Kejriwal News : मोदी-शाहांपुढे न झुकणाऱ्या अरविंद केजरीवालांनी आता पाकिस्तानी नेत्याला भरला सज्जड दम

Loksabha Election 2024 Phase 6 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी मग पाकिस्तानी नेते फवाद चौधरींचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले,"चौधरीसाहेब,मी आणि माझा देश...
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्प्यासाठी दोन केंद्रशासित प्रदेशांसह आठ राज्यांमधील 58 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली.या या मतदारसंघात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रचारात उतरलेल्या आणि मोदी- शाह यांना शह देणाऱ्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी तर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.पण मतदानादिवशीच त्यांनी पाकिस्तानी नेत्याला झापलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी कुटुंबियांसह शुक्रवारी (ता.25) मतदानाचा हक्क बजावला.त्यांनी मतदानानंतर कुटुंबासोबतचा फोटोही ट्विट केला. यानंतर केजरीवालांनी दिल्लीकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं. पण त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोवर थेट पाकिस्तान-तहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली.यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता असतानाच केजरीवालांनी त्या खडे बोल सुनावले.

Arvind Kejriwal
NCP Politcal News : राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का; 'या' नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

फवाद चौधरी नेमकं काय म्हणाले..?

इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पाकिस्तान-तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे नेते फवाद चौधरी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटवर कमेंट दिली. त्यात त्यांनी "शांती आणि सद्भभावनेनं द्वेष आणि कट्टरतावादी ताकदींना हरवलं जाऊ शकतं" असं म्हटलं.

अरविंद केजरीवालांनी दिले 'हे' प्रत्युत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी मग पाकिस्तानी नेते फवाद चौधरींचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले,"चौधरीसाहेब,मी आणि माझा देश आमचे वाद हाताळण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहोत.त्यासाठी आपण ट्विट करण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचवेळी त्यांनी सध्या पाकिस्तानची (Pakistan) अवस्था खूपच खराब आहे.तुम्ही तुमच्या देशाची काळजी करा.भारतात होत असलेल्या निवडणुका हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. दहशतवादाच्या सर्वात मोठ्या प्रायोजकाचा हस्तक्षेप आम्ही सहन करणार नसल्याचं म्हणत चौधरींना सज्जड दमही भरला.

दिल्लीतील लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानाच्या एक दिवस आधीच अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीचा मोठा विजय होणार असल्याचे सांगितले होते. तर भाजप 400 पासून खूप दूर असणार असल्याचेही केजरीवाल ते म्हणाले होते. ते म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत भाजपला 200 जागा मिळणेही मुश्किल आहे. तर इंडिया आघाडीला 300 हून अधिक जागा मिळतील. तसेच दिल्लीतील सातही जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार जिंकणार आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Arvind Kejriwal
Lok Sabha Election News : दुसरं तिसरं कोणी नाही तर लालबहादूर शास्त्रींच्या नातवानेच सांगितल्या 'एनडीए'ला मिळणार किती जागा ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com