केजरीवालांचा दे धक्का! मुख्यमंत्री मान यांना डावलून थेट हाती घेतली सूत्रे

पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत आम आदमी पक्षाने सत्ता मिळवली आहे.
Bhagwant Mann & Arvind Kejriwal News
Bhagwant Mann & Arvind Kejriwal NewsSarkarnama
Published on
Updated on

चंडीगड : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) सत्ता मिळवून सगळ्यांनाच धक्का दिला होता. मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी धूमधडाक्यात काम सुरू केले आहे. पण आता आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी थेट मान यांना डावलल्याचं समोर आलं आहे. पंजाबमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक केजरीवाल यांनी मान यांच्या अनुपस्थितीत घेतल्याने गदारोळ उडाला आहे.

पंजाबमध्ये (Punjab) ऐतिहासिक विजय मिळवत आपने सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा धडाका सुरू केला आहे. केजरीवाल यांनी मंत्र्यांनाही कामांसाठीचे उद्दिष्ट्य निश्चित करून दिले आहे. केजरीवाल यांच्याच आदेशानुसार हे करण्यात आले होते. आता केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांना बाजूला करून स्वत:च सूत्रे हाती घेतली आहेत. केजरीवालांनी पंजाब वीज महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव आणि ऊर्जा सचिव उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री मान हेच या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. यामुळे गदारोळ उडाला आहे.

Bhagwant Mann & Arvind Kejriwal News
सोमय्या पिता-पुत्रांचा पाय खोलात! कधीही होऊ शकते अटक

काही दिवसांपूर्वीच इशारा

काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी पंजाबच्या नवीन मंत्रिमंडळाला सूचक इशारा दिला होता. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवीन मंत्र्यांशी संवाद साधला होता. ते म्हणाले होते की, नवीन मंत्र्यांना टार्गेट दिले असून, ते वेळेत पूर्ण झाल्यास नागरिकच त्यांना हटवण्याची मागणी करतील. पक्षाच्या आमदारांनी लोकांमध्ये फिरले पाहिजे. गावांमध्ये गेले पाहिजे. पंजाबमधील लोकांनी हिरे निवडले असून, आपल्याला 92 जणांची टीम म्हणून मान यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. मी फक्त त्यांचा मोठा भाऊ आहे. कामाच्या बाबतीत आमदारांनी दक्ष राहायचे आहे. आपल्या मतदारसंघात प्रत्येक गावात कार्यालय हवे. दिवसातील किमान 18 तास काम करावे.

Bhagwant Mann & Arvind Kejriwal News
पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवारावर हल्ला अन् पोलिसांची बघ्याची भूमिका

नव्या वादाला आमंत्रण

मी दिल्लीतून सगळ्यांचे काम पाहणार आहे. प्रत्येक आमदार आणि मंत्र्याबाबत लोकांकडून माहिती घेतली जाईल. मागील वर्षी काही आमदारांबाबत नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांचं तिकीट कापून इतरांना संधी देण्यात आली आणि ते निवडूनही आले, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते. आता केजरीवालांनी मुख्यमंत्र्यांना डावलून थेट अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याने नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. केजरीवालांनी आधी दिलेला इशारा खरा करून दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com