NMC Politics: नाशिक महापालिकेत नवा पायंडा; विरोधी पक्षनेतेपदी प्रथमेश गीते, तर सभागृह नेतेपदी अजिंक्य साने यांची वर्णी!

Nashik Municipal Corporation latest news : नाशिक महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड! प्रथमेश गीते यांची विरोधी पक्षनेतेपदी, तर अजिंक्य साने यांची सभागृह नेतेपदी निवड झाली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Nashik corporator booked by police
Nashik corporator booked by policeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Himgauri Adke News: नाशिक महापालिकेत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा तिढा प्रदीर्घकाळ रेंगाळला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यावर निर्णय झाला. आता विरोधी पक्ष नेते पदाची नियुक्ती होणार आहे.

महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदे या तरुणांच्या हाती सध्या कारभार आहे. महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने हा निर्णय घेतला. त्यामुळे तरुणांच्या हाती निर्णयाची सूत्रे गेली आहेत.

Nashik corporator booked by police
Abhimanyu Pawar : सहकाराच्या निमित्ताने औशात नवे राजकीय समीकरण; पवार-देशमुखांची जवळीक निलंगेकरांसाठी धोक्याची घंटा!

हाच पायंडा पुढेही राहणार अशी चिन्हे आहेत. दीर्घकाळ रेंगाळलेला विरोधी पक्षनेतेपदाचा विषय आता मार्गी लागला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रथमेश गीते यांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या (शुक्रवारी) महापौर ही घोषणा करती अशी अपेक्षा आहे.

महापालिकेत महायुतीकडे शंभराहून अधिक संख्याबळ आहे. त्यात भाजपकडे 70 राहून अधिक सदस्य आहेत. त्यामुळे महापालिकेत एक हाती सत्ता असल्यासारखी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सभागृह नेतेपदी भाजपच्या अजिंक्य साने आणि पुंडलिक खोडे यांच्या नावाची चर्चा होती. आता अजिंक्य साने यांची सभागृह नेतेपदी निवड करण्याचा संकेत भाजपच्या नेत्यांनी दिला आहे.

Nashik corporator booked by police
Kishtwar terrorist attack : किश्तवाडच्या जंगलात थरार! बेपत्ता दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, अंगावर काटा आणणारी दहशतवाद्यांची क्रूरता उघड

गेल्या आठवड्यात दहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती झाली. त्यामध्ये भाजपचे सहा तर शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रत्येकी दोन असे दहा सदस्य नियुक्त करण्यात आले. संदर्भात काँग्रेसचे सुफी जिन यांनी वेगळा राजकीय डाव टाकून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस पक्ष सध्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सोबत गट नोंदणी असलेला पक्ष आहे.

मात्र नगरसेवक जीन यांनी भाजपचे सुनील आडके यांच्या नावाची शिफारस केली होती. ते पत्र आयुक्तांकडे देण्यात आल्याने मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. प्रशासनाने याबाबत निर्णय घेऊन घटनेता नसलेल्या जीन यांचे पत्र फेटाळले आहे. त्यामुळे महापालिकेतील सदस्य आणि पदाधिकारी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.