Lockdown news : देशात कोरोनासारखा लॉकडाऊन लागणार का? मोदी सरकारनेच दिली मोठी अपडेट

West Asia crisis India update : देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा मुबलक साठा आहे.
West Asia crisis India update
West Asia crisis India updateSarkarnama
Published on
Updated on

Lockdown rumours india 2026 : इराण युध्दामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांना पुढील काळात मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पश्चिम आशियातील स्थितीवर निवेदन देताना याबाबत स्पष्ट संकेत दिले होते. कोरोना काळात आपण दाखविलेली एकजुट पुढील काळातही दाखवावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार अशा अफवा पसरल्या आहेत.

केंद्र सरकारकडून या अफवांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोशल मीडियात पोस्ट करत लॉकडाऊनचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक परिस्थिती अजूनही अनिश्चित असल्याचे सांगत पुरी यांनी म्हटले आहे की, आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी आणि आवश्यक वस्तूंशी संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत.

सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. प्रत्येक संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. भारताने जागतिक अनिश्चिततेच्या काळात यापूर्वीही आपली ताकद दाखवली असून यापुढेही सक्रीयपणे आवश्यक पावले उचलत राहू, असे पुरी यांनी स्पष्ट केल आहे.

West Asia crisis India update
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? संसदेत दिलेत संकेत, सर्व मुख्यमंत्र्यांना निरोप

लॉकडाऊनबाबत पसरलेल्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. सरकारच्या पातळीवर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले. आपण सर्वांनी शांतपणे, जबाबदार आणि एकजुटीने वागणे आवश्यक असल्याचे आवाहनही पुरी यांनी केले आहे.

दरम्यान, देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा मुबलक साठा आहे. देशात पुढील दोन महिने पुरेल एवढा क्रुड इंधन उपलब्ध होणार असल्याचे मोदी सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

West Asia crisis India update
Assembly Election : ममता बॅनर्जी इतिहास घडविणार की भाजप झटका देणार? ‘ओपिनियन पोल’ने वाढवले टेन्शन

एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे देशात एलपीजीचा तुटवडाही नाही. देशभरात दररोज ५० लाख सिलिंडरचे वितरण होत आहे. देशांतर्गत उत्पादन वाढल्याने आयात कमी झाली आहे. इंधन व एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com