AN-32 Plane Crash : भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं; क्षणात विमानाचे झाले दोन तुकडे, 5 जवानांचा जागीच मृत्यू

Jorhat Airbase Tragedy : हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 च्या सुमारास नियमित उड्डाणा दरम्यान धावपट्टीवर लँडिंग करताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. हे विमान समांतर टॅक्सीवेवरून वेगाने पुढे गेले आणि क्षणात त्याचे दोन तुकडे झाले आणि त्याला आग आग लागली.
Indian Air Force AN-32 transport aircraft seen after the crash at Jorhat Airbase, Assam.
Wreckage of the Indian Air Force AN-32 transport aircraft seen after the crash at Jorhat Airbase, Assam. The tragic AN-32 plane crash claimed the lives of five personnel.Sarkarnama
Published on
Updated on

Assam AN-32 Plane Crash : आसामच्या जोरहाट एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला. एअरबेसवर लँडिंग करत असताना हवाई दलाचं रशियन बनावटीच्या 'अँटोनोव्ह एएन-32' या विमान क्रॅश झालं. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

विमानामध्ये दोन अधिकारी आणि दोन अग्निवीरांचा समावेश असल्याची माहिती हवाई दलाने दिली. तर या अपघातात विमानाचे दोन तुकडे आहेत. तर या घटनेत विमानातील को पायलट बचावले आहेत. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या विमान अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 च्या सुमारास नियमित उड्डाणा दरम्यान धावपट्टीवर लँडिंग करताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले. हे विमान समांतर टॅक्सीवेवरून वेगाने पुढे गेले आणि क्षणात त्याचे दोन तुकडे झाले आणि त्याला आग आग लागली.

Indian Air Force AN-32 transport aircraft seen after the crash at Jorhat Airbase, Assam.
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेत वादाचा भडका: पदावरून गच्छंती होताच जिल्हाप्रमुखाकडून कार्यालयात राडा

घटनेची माहिती मिळताच जोरहाट हवाई तळाच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. एएन-३२ हे रशियन बनावटीचे, दोन इंजिन असलेले लष्करी वाहतूक करणारे विमान आहे.

तर या दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि दानिश आलम हे ठार झाले. विमानात एकूण सहा जण होते. त्यापैकी सह-वैमानिक जखमी झाला असून त्यांच्यावर जोरहाट लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Indian Air Force AN-32 transport aircraft seen after the crash at Jorhat Airbase, Assam.
Washim family death case : महाराष्ट्र हादरला! पतीने पत्नीसह पोटच्या लेकींचे हात बांधून विहिरीत ढकललं अन् स्वतःचं आयुष्यही संपवलं

एएन-32 हे रशियन बनावटीचे, दोन इंजिन असलेले लष्करी वाहतूक करणारे विमान असून ते भारतीय हवाई मागील चार दशकांपासून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. कारगील युद्धापासून बचावकार्य राबवण्यामध्ये या विमानाची महत्त्वाची भूमिका होता. मात्र, याआधीही हे विमान क्रॅश झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com