Tamil Nadu Election Result Live: तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून पराभव

Assembly Election Results Live Update : तामिळनाडूमध्ये स्टालिन पुन्हा बाजी मारणार का, याचे चित्र आज स्पष्ट होईल. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील 'एलडीएफ' (LDF) सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करून इतिहास घडवणार की, दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची केरळची जुनी परंपरा राखत काँग्रेस प्रणित 'यूडीएफ' (UDF) बाजी मारणार, याचे चित्र आज स्पष्ट होईल.जाणून घ्या प्रत्येक मतदारसंघाचे लाईव्ह अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Assembly election counting
Assembly election countingSarkarnama
Published on
Updated on

आसाममध्ये भाजपचं शतक, 100 जागांवर आघाडी

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.  'टीव्हीके'च्या उमेदवार एस.बाबू 'जायंट किलर' ठरले

काँग्रेसचे नेते गौरव गोगई यांचा अवघ्या 23 हजार मतांनी पराभव

आसाम विधानसभा निवडणुकीत जोरहाट मतदारसंघातून अत्यंत नाट्यमय निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गौरव गोगई (Gaurav Gogoi) यांचा अवघ्या 23 हजार मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे Hitendra Nath Goswami यांनी हा थरारक विजय मिळवत जोरहाटमध्ये बाजी मारली.

तमिळनाडूत 'विजय'

तमिळनाडूत अभिनेता थलपती विजयचा टीव्हीके पक्ष सत्तेवर आला आहे. तो केवळ दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेला पक्ष असून द्रमुक व अण्णा द्रमुक या नेहमीच्या पारंपरिक व जुन्या पक्षांना त्याने पराभूत केले आहे.

केरळ, डाव्यांचा शेवटचा किल्लाही ढासळला

केरळमध्ये काॅंग्रेस आघाडीने डावी आघाडीचा पराभव केला. इथे सलग दोन वेळा कम्युनिस्ट म्हणजे डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात इथे सत्ताविरोधी लाट होती. इथे डावी व काॅंग्रेस नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक आघाडी अशीच लढत होत असते व याच आघाड्या आलटून पालटून विजय मिळवतात. अपवाद गेली निवडणूक ‌

बंगाल, ममता सत्तेबाहेर

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव व भाजपचा विजय. ममता सलग तीन वेळा निवडून आल्या होत्या. चौथ्यांदा त्या पराभूत झाल्या. सत्ताविरोधी लाटेचा व भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर व कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांतून निर्माण केलेल्या वातावरणाचा वापर करत इथे विजय मिळवला.

आसाम, भाजपची हॅटट्रिक

आसाममध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा मोठा विजय प्राप्त करत सत्ता राखली आहे. काॅंग्रेस व भाजप अशी थेट लढत इथे होत असते‌. पण या गेल्या तिन्ही निवडणुकीत काँग्रेसला वाईट पराभवाला सामोरे जावे लागले.

पुदुच्चेरीत भाजप आघाडी

पुद्दुचेरीत भाजप व त्यांचा मित्रपक्ष आघाडीने पुन्हा एकदा काॅंग्रेस व द्रमुक आघाडीचा पराभव केला.

पुडुचेरीचे मुख्यमंत्री N. Rangaswamy हे विजयी झाले आहेत.

Tamil Nadu Result LIVE:उदयनिधी स्टालिन फक्त 300 मतांनी पुढे

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री Udhayanidhi Stalin (DMK) हे फक्त ३०० मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात AIADMK कडून आदि राजाराम तर Vijay यांच्या TVK पक्षाकडून डी. सेल्वम रिंगणात आहेत. सध्या डी. सेल्वम दुसऱ्या क्रमांकावर असून मुकाबला अत्यंत टोकाचा बनला आहे.

अभिनेते-राजकारणी विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेने तामिळनाडूत सत्तेच्या दिशेने पावले टाकली आहे.   बहुमताचा आकडा केला पार केला आहे. 

Puducherry Election Result LIVE: रंगासामी आघाडीवर; काँग्रेसलाही दिलासा

केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सध्या रोचक चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री N. Rangasamy यांच्या नेतृत्वाखालील AINRC आघाडीने किमान ७ जागांवर आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणारे रंगासामी थट्टनचावडी मतदारसंघातून सुमारे ३,५९१ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष पुन्हा सत्ता राखण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Kerala Result LIVE: केरळमध्ये काँग्रेसचा CM कोण? शशी थरूर म्हणाले…

केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेस-प्रणीत आघाडीची कामगिरी सुधारताना दिसत आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर Shashi Tharoor यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

थरूर म्हणाले, “पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूच्या निकालांनी मला आश्चर्य वाटले. पण केरळमध्ये काँग्रेसच्या पुनरागमनामुळे आनंद झाला आहे. राज्यात बदलाची गरज होती.” मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “CM कोण होणार याचा अंतिम निर्णय पक्षाचे आलाकमान घेईल.”

 Assam Election Result LIVE: आसाममध्ये भाजप बहुमताच्या पुढे; काँग्रेस आघाडी पिछाडीवर

आसाम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. ताज्या रुझानांनुसार भाजप ६६ जागांवर आघाडीवर असून बहुमताच्या आकड्यापेक्षाही पुढे गेली आहे. त्यामुळे आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता कायम राहण्याची शक्यता बळावली आहे.

दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी १९ जागांवर आघाडीवर असून सत्तेसाठी आवश्यक अंतर अजून खूप मोठे आहे. सध्याचे ट्रेंड पाहता एक्झिट पोलचे अंदाज जवळपास खरे ठरताना दिसत आहेत.

Tamil Nadu Election Result LIVE: सध्याच्या ट्रेंडनुसार DMK तिसऱ्या क्रमांकावर

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या रुझानांमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या Vijay यांच्या TVK (तमिळगा वेत्री कळघम) पक्षाने दमदार कामगिरी करत ७८ जागांवर आघाडी घेतली आहे.

दुसरीकडे, सध्याचे मुख्यमंत्री M. K. Stalin आपल्या मतदारसंघात पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील DMK पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत असून पक्ष फक्त ४३ जागांवर आघाडीवर आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार DMK तिसऱ्या क्रमांकावर घसरताना दिसत आहे.

 Kerala Chunav Result 2026 LIVE: केरल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; UDF आघाडीवर

 सुरुवातीच्या कलांनुसार UDF आघाडीने 58 जागांवर आघाडी घेतली आहे, तर सत्तारूढ LDF फक्त 22 जागांवर पुढे आहे. याशिवाय NDA आघाडीनेही 7 जागांवर आघाडी मिळवली आहे, त्यामुळे केरलच्या राजकारणात चुरस वाढताना दिसत आहे.

या निवडणुकीत एकूण 883 उमेदवार रिंगणात उतरले असून सर्वांचे राजकीय भविष्य आज ठरणार आहे. सध्या Pinarayi Vijayan यांच्या नेतृत्वाखालील LDF सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याचा ऐतिहासिक प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, UDF आपली गमावलेली राजकीय ताकद पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर NDA राज्यात आपले खाते उघडण्याच्या आशेने मैदानात उतरले आहे.

Tamil Nadu Election Results LIVE: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून ज्योतिषी राधन पंडित फुलांचा गुच्छ घेऊन टीव्हीके प्रमुख विजय यांच्या नीलंकराई येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

तामिळनाडूमध्ये TVR आणि DMK मध्ये जोरदार टक्कर बघायला मिळत आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या पक्षाची धमाकेदार कामगिरी दिसत आहे.

तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री स्टँलिन एका जागेवर पिछाडीवर,  उपमुख्यमंत्रीही पिछाडीवर 

Election Result Live : तामिळनाडूत पहिला कल TVK च्या बाजूना लागलाय.

केरळमध्ये एकूण जागा: 140 बहुमताचा आकडा: 71 जागा The Indian Express यंदा लढत अत्यंत अटीतटीची मानली जात आहे

केरळमधील 140 विधानसभा जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर येऊ लागले असून सध्या Left Democratic Front (LDF) आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर United Democratic Front (UDF) काही प्रमाणात मागे आहे. उपलब्ध माहितीनुसार, LDF सध्या 45 जागांवर आघाडीवर असून UDF 32 जागांवर पुढे आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा डाव्या आघाडीचे वर्चस्व राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हे केवळ सुरुवातीचे कल असून अनेक मतदारसंघांमधील मतमोजणी अद्याप सुरू आहे. त्यामुळे पुढील काही तासांत चित्रात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केरळमध्ये पूर्वीही मतमोजणीदरम्यान मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच राज्यातील सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील 'एलडीएफ' (LDF) सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करून इतिहास घडवणार की, दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची केरळची जुनी परंपरा राखत काँग्रेस प्रणित 'यूडीएफ' (UDF) बाजी मारणार, याचे चित्र आज स्पष्ट होईल. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com