Badrinath donation Theft : अयोध्येतील राम मंदिरानंतर बद्रीनाथ धाममध्ये देणगी चोरी? 'तो' व्हिडिओ व्हायरल, मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप

Ayodhya Ram Temple Incident Badrinath : बद्रीनाथ धाममध्ये भाविक देणगी आणि दानात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक आरोप होतोय.
 Badrinath Temple
Badrinath Temple sarkarnama
Published on
Updated on

Badrinath News : बद्रीनाथ धाममध्ये भाविक देणगी आणि दानात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक आरोप होतोय. सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.या संदर्भात श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने चार कर्मचाऱ्यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

या संपूर्ण कथित चोरी प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चार सदस्यीय उच्चस्तरीय अंतर्गत तपास समिती स्थापन करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, "अयोध्या येथील राम मंदिरात जो चोरीचा प्रकार समोर आला आहे, ती केवळ सामान्य चोरी नाही. हा एक प्रकारचा 'ऑर्गनाइझ्ड क्राईम' (संघटित गुन्हेगारी) आहे. असाच प्रकार बद्रीनाथ-केदारनाथ ट्रस्टच्या बाबतीतही घडला आहे."

पुढे बोलताना त्यांनी थेट आरोप केला की, देशातील बहुतांश प्रमुख मंदिरे सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. भाजपच्या लोकांनी या मंदिरांवर कब्जा केला असून, या सर्व ठिकाणी देवाच्या चरणी येणाऱ्या दानात चोऱ्या आणि आर्थिक गैरव्यवहार सुरू आहेत.

 Badrinath Temple
BJP And Ram Mandir Controversy : राम मंदिर देणगी घोटाळ्यात ट्विस्ट; भाजप नेत्याचाच गंभीर दावा, ‘चंपत राय यांच्यासह तिघांना होऊ शकतो तुरुंगवास’

विरोधक सरकारला घेरणार?

बद्रीनाथ मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या या कथित गैरव्यवहारामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. आता मंदिर समितीच्या उच्चस्तरीय चौकशीतून काय तथ्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 Badrinath Temple
Mukesh Ambani 900 Crore Donation : राम मंदिर देणगीवरून नवा वाद; अंबानींच्या 900 कोटींचा हिशेब कुठे? काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com