Dhirendra Shastri : 'माझ्या कुंडलीतच वादाचा योग?': शिवाजी महाराजांवरील विधानानंतर बागेश्वर बाबाची मोठी कबुली!

Dhirendra shastri latest news controversy : शिवाजी महाराजांवरील वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर धीरेंद्र शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली. बागेश्वर बाबांनी नेमकं काय सांगितलं ते जाणून घ्या.
Dhirendra Krishna Shastri
Dhirendra Krishna ShastriSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्ताव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी अखेर माफी मागितली आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या बोलण्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आणि त्यामुळे गैरसमज निर्माण झाला.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, “असं वाटतं की माझ्या कुंडलीतच वादाचा योग आहे. विशेषतः नागपूरमध्ये आलो की काही ना काही वाद निर्माण होतो. मी काही चुकीचं बोललो नाही, तरीही माझ्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ काढला गेला.” त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत आदराने आणि गौरवानेच बोलण्याचा प्रयत्न केला होता.

Dhirendra Krishna Shastri
Sexual Assault Case : मंत्री नीतेश राणेंच्या सभेला पोलिसांचा ‘नो’! परतवाडा लैंगिक प्रकरणात उजैरखानचा पुन्हा 'SIT'कडे ताबा

ते पुढे म्हणाले की, “मी शिवाजी महाराजांच्या महानतेबद्दल सांगत होतो. ते किती पराक्रमी, संतस्वभावी आणि भक्तिमान होते हे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा विपर्यास करण्यात आला.” यामुळे वाद निर्माण झाला असून, त्यांनी याबाबत खेद व्यक्त करत माफीही मागितली आहे.

आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, “कोणी माझं संपूर्ण वक्तव्य ऐकलं आणि त्याचा खरा अर्थ समजून घेतला, तर मी चुकीचं काही बोललो असं त्यांना वाटणार नाही. तरीही जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमायाचना करतो.”

Dhirendra Krishna Shastri
Mumbai News: विरारमध्ये ‘भाई-डॅडी’ ची गळाभेट! गवळी-ठाकूर फोटो व्हायरल; चर्चांना उधाण

अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, त्यांचा दरबार अंधश्रद्धा वाढवण्यासाठी नाही. उलट लोकांना योग्य श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावा, हा त्यामागचा उद्देश आहे. “जाणून, समजून ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा, आणि न कळत ठेवलेला विश्वास म्हणजे अंधश्रद्धा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com