Sexual Assault Case : मंत्री नीतेश राणेंच्या सभेला पोलिसांचा ‘नो’! परतवाडा लैंगिक प्रकरणात उजैरखानचा पुन्हा 'SIT'कडे ताबा

Uzair Khan SIT investigation Maharashtra case: अमरावती इथल्या परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात भाजप मंत्री नीतेश राणे उद्या सभा घेत असून, या प्रकरणात आणखी मोठी अपडेट समोर आली आहे.
Paratwada rape case accused in SIT custody
Paratwada rape case accused in SIT custodySarkarnama
Published on
Updated on

Paratwada Sexual Assault Case: अमरावतीच्या परतवाडा युवतींच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, भाजप मंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आयोजकांनी मात्र सभा कोणत्याही परिस्थिती होणार असल्याची भूमिका घेतली आहे.

यातच, एका पीडिताची आई समोर येत 'SIT' समोर जबाब नोंदवला आहे. यात उजैरखान विरोधात विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यामुळे परतवाडा लैंगिक शोषणाचं प्रकरण पुन्हा तापलं आहे.

अमरावती परतवाडा युवतींचे लैंगिक शोषण, अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. 29) भाजप मंत्री नीतेश राणेंची (Nitesh Rane) सभा होत आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पण आयोजिकांनी सभा कोणत्याही परिस्थितीत होणार, अशी भूमिका घेतल्याने परतवाडा इथलं वातावरण पुन्हा तापलं आहे. यामुळे परतवाडा परिसरात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

परतवाडा इथल्या लैंगिक अत्याचार व व्हिडिओ व्हायरल (Crime) प्रकरणात एका पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून उजैरखान इक्बाल खान (वय 20) विरुद्ध विनयभंग व पोक्सो अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पुन्हा त्या गुन्ह्यात SITने अटक केली असून त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Paratwada rape case accused in SIT custody
Paratwada Scandal : परतवाडा लैंगिक केसमध्ये नवा ट्विस्ट! प्यारे खान यांनी माहिती समोर आणताच, हिंदू-मुस्लिम रंग फिका

याप्रकरणात पोलिसांनी स्वत:हून 13 एप्रिलला माहिती तंत्रज्ञान कायदा, विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास सुरू असतानाच अटक झालेल्या आठपैकी पाच जणांना अटक केली.

मुख्य संशयित सूत्रधार अयान अहमद तन्वीर अहमद (वय 19, परतवाडा), उजैर खान इक्बाल खान (वय 20), मोहंमद साद मोहंमद साबीर (वय 22), तरबेज खान तसलीम खान (वय 24, तिन्ही रा. अचलपूर) व ऐफाज खान मंजूर खान (वय 26) या पाच जणांचा समावेश आहे.

Paratwada rape case accused in SIT custody
Amravati Sexual Exploitation Case : परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात पुराव्यांवर भर; एकीच्या धाडसी जबाबानं तपासाला वेग, ‘SIT’ सात पीडितांच्या नातेवाईकांच्या संपर्कात

न्यायालयाने या पाच जणांची पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे. त्यापैकी उजैरखानविरुद्ध दुसरा पोक्सोचा गुन्हा नोंद झाल्याने त्या गुन्ह्याच्या तपासात त्याला पुन्हा SITने ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. उर्वरित चौघांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दोन पीडितांचे नोंदविले जबाब

गुन्हा दाखल झाल्यानंतर एकूण आठ पीडितांचे शोषण, विनयभंग झाल्याचे प्रकरण पुढे आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर 13 दिवसांमध्ये त्यापैकी दोन अल्पवयीन पीडित जबाब देण्यासाठी SITच्या तपास पथकापुढे हजर झाल्या आहेत. त्यापैकी उजैरने मुलीची छेडछाड केल्याच्या दुसऱ्या गुन्ह्यातील पीडितेच्या आईचे जबाब नोंदवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com