AIMIM Student Protest Police Action : विद्यार्थिनींना मारहाण करणाऱ्या IPS अधिकाऱ्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करा; राष्ट्रपतींकडे AIMIMची मोठी मागणी

AIMIM leader seeks President's action over alleged police excesses during student protests : दिल्लीसह विविध राज्यांतील विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचा आरोप; संबंधित IPS व पोलिस अधिकाऱ्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची AIMIMची राष्ट्रपतींकडे मागणी.
AIMIM Student Protest Police Action
AIMIM Student Protest Police ActionSarkarnama
Published on
Updated on

Summary

  • विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांविरोधात एआयएमआयएमची मागणी

  • राष्ट्रपतींकडे परवेज अशर्फी यांची तक्रार

  • मुलींवरील पोलिस कारवाईचा निषेध

  • दिल्ली विद्यार्थी आंदोलन ताज्या घडामोडी

  • नीट पेपरफुटी आंदोलन बातमी

Student Protest India : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष डाॅ. परवेज अशर्फी यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिल्लीसह वेगवेगळ्या राज्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांकडून सुरू असलेल्या अमानुष अत्याचारावर मोठी मागणी केली आहे. या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर, विशेष करून मुलींना मारहाण करणारे आयपीएस अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांवर विनयभंगाचे गुन्हे नोंदवून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मोठी मागणी केली.

या आंदोलनात सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या संलग्न संघटनांचे कथित गुंड प्रवृत्ती घुसल्याचेही समजते. या गुंडांविरोधात कारवाईसाठी संबंधित राज्यांच्या राज्यपालांना स्वतंत्र आदेश द्यावा, अशी मागणी करत खळबळ उडवून दिली.

देशातील नीट परीक्षा (NEET Exam) पेपरफुटीप्रकरणी क्राॅक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला गेल्या तीन दिवसात हिंसक वळण लागले आहे. यानंतर, संपूर्ण देशातील राज्यराज्यात आंदोलनाची धग पोहोचली आहे.

दिल्लीतील आंदोलन चिरडण्यासाठी केंद्रातील भाजपच्या (BJP) मोदी सरकारने दिल्ली पोलिसांच्या बळाचा वापर केला. यात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. अधूश्रुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. यात मुलींना देखील पोलिसांनी सोडले आहे, असा गंभीर आरोप ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष डाॅ. परवेज अशर्फी यांनी केला.

AIMIM Student Protest Police Action
Fake Drugs Case Threat : 'त्या पोलिसाचे फक्त निलंबित नको, थेट...'; फडणवीसांना ठाकरेंच्या शिलेदारानं करून दिली विधिमंडळातील घोषणेची आठवण

आंदोलनात सहभागी झालेल्या लहान-लहान मुलींना आयपीएस अधिकाऱ्यांना लक्ष्य करत मारहाण केली. काही पोलिस अधिकाऱ्यांनी मुलांचा मारहाणीत विनयभंग केला. मुंबईतील आंदोलनादरम्यान देखील मुलींबरोबर असाच प्रकार झाला आहे. या प्रकाराच्या चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. पुरावा म्हणून या चित्रफिती बऱ्याच काही सांगून जातील, असा दावा डाॅ. परवेज अशर्फी यांनी केला आहे.

AIMIM Student Protest Police Action
BJP On Abhijeet Dipke : 'अभिजित दीपके भविष्यात भीम आर्मीच्या तिकिटावर निवडणूक लढवतील'; निशिकांत दुबे यांचा दावा

राज्यपालांना कारवाईचा आदेश द्या

देशाच्या भविष्याशी केंद्रातील भाजप सरकार खेळत असल्याने, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी. या आंदोलनात भाजपशी संलग्न असलेल्या संघटनांमधील गुंड प्रवृत्ती घुसल्या आहेत. यावर कारवाईसाठी संबंधित राज्यांच्या राज्यपालांना आदेश देत स्वतंत्र कारवाई करावी, अशी मागणी देखील डाॅ. परवेज अशर्फी यांनी केली.

भाजपमुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलीन

आंदोलनात मुलींबरोबर असलेल्या प्रकारामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर भाजप प्रतिमा खराब करत आहे. आंदोलकांना भाजप आणि त्यांच्या संलग्न संघटना, मित्रपक्ष दहशतवादी म्हणून आपमान करत आहेत. देशाचे भवितव्य धोक्यात घालत आहेत, असा गंभीर मुद्याकडे डाॅ. अशर्फी यांनी लक्ष वेधले.

दिल्ली पोलिसांनी देशातील महिलांचा अपमान केलाय

या आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींचा, देशाच्या पोलिसांकडून अपमान होणे, हे लज्जास्पद आहे. आपण एक सक्षम महिला असून, देशाच्या सर्वोच्च पदावर बसून नेतृत्व करत आहात. देशाचे नेतृत्व करणाऱ्या, सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या महिलेसमोर, महिलांचा कायद्याचे रक्षक अमानुषपणे अन्याय, अत्याचार करणे कितपत योग्य आहे, असा सवाल डाॅ. परवेज अशर्फी यांनी केला आहे.

FAQs

1. डॉ. परवेज अशर्फी यांनी कोणती मागणी केली?

विद्यार्थी आंदोलनात कथित गैरवर्तन करणाऱ्या पोलिस आणि आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली.

2. ही मागणी कोणाकडे करण्यात आली?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे.

3. आंदोलन कोणत्या मुद्द्यावर सुरू आहे?

नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भातील विद्यार्थी आंदोलन.

4. एआयएमआयएमने कोणते आरोप केले?

विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अमानुष वागणूक व मुलींशी गैरवर्तन झाल्याचा आरोप केला.

5. या प्रकरणात कोणत्या राज्यांचा उल्लेख आहे?

दिल्लीसह विविध राज्यांतील आंदोलनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com