Ravindra Chavan Oath Ceremony: रविंद्र चव्हाण यांनी खासदारकीची शपथ घेताच गदारोळ; काय घडलं लोकसभेत?

Ravindra Chavan MP oath Lok Sabha: प्रियांका गांधी यांच्यासह रविंद्र चव्हाण यांनी गुरूवारी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. रविंद्र चव्हाण यांनी मराठीतून शपथ घेतली.
Ravindra Chavan
Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी गुरूवारी सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्याआधी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांगा गांधी यांनीही शपथ घेतली. दोघांची शपथ पूर्ण होताच लोकसभेत गदारोळ सुरू झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काही मिनिटांतच कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब केले.

रवींद्र चव्हाण यांनी आज लोकसभेत मराठीतून खासदारकीची शपथ घेतली आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली. काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेरच्या फेऱ्यांमध्ये त्यांचा विजय झाला आहे. सुरूवातीच्या अनेक फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर होते.

Ravindra Chavan
Priyanka Gandhi : केरळची पारंपरिक कसावू साडी अन् हातात संविधान..! प्रियांका गांधींची लोकसभेतील पहिली 'एन्ट्री' चर्चेत

चव्हाण यांनी शपथ पूर्ण केल्यानंतर जय संविधानचा नारा दिला. त्यानंतर ते सही करायला जात असतानाच अध्यक्षांनी प्रश्न पुकारला. त्याचवेळी विरोधकांना गदारोळ घालण्यास सुरूवात केली. गौतम अदानी लाच प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. पण अध्यक्षांनी त्यावर चर्चा करण्यास नकार दिला. या गोंधळातच चव्हाण यांनी सही केली.

विरोधक अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागे एकत्रित येऊन जोरजोरात घोषणा देत होते. त्यानंतर अध्यक्षांनी विरोधकांना कामकाज चालू देण्याची विनंती केली. पण विरोधक ऐकण्यास तयार नसल्याने कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. दुपारी 12 वाजता पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा चर्चेची मागणी केली. पण तालिका अध्यक्षांनी त्यांची मागणी मान्य न केल्याने विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Ravindra Chavan
BJP Politics : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र; अमित शाह आणि तावडेंच्या भेटीमुळे मुख्यमंत्रि‍पदाचा सस्पेन्स वाढला, नेमकी चर्चा काय?

प्रियांका गांधींनी घेतली शपथ

संसदीय राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेत असणार आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरूवारी लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आपल्या संसदीय राजकारणाची सुरूवात केली. प्रियांका गांधी यांचे बंधू व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या आई राज्यसभेच्या सदस्य सोनिया गांधी अनेक वर्षांपासून संसदेत आहेत. प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवत पहिल्यांदात संसदेत दाखल झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com