BJP Vs Prashant Kishor : भाजपचा मोठा पराभव की 'पीके'चे पॅकअप; मोदी- शहांची प्रतिष्ठा पणाला, आजच फैसला!

Bankipur Assembly Bypoll Result : अवघ्या काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे.
Amit Shah, Narendra Modi
Amit Shah, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Prashant Kishor Politics : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. अवघ्या काही वेळात मतमोजणीला सुरुवात होईल.एक्झिट पोलच्या आकड्यानुंसार या ठिकाणी प्रशांत किशोर यांचा विजयाचा दावा केला जात आहे.

बांकीपूर भाजपचा बालेकिल्ला आहे. येथे त्यांची बूथ यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही विजयाचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आज नेमका निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, या निवडणुकीचा निकाल भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा हा मतदारसंघ आहे. राज्यसभेवर निवड झाल्यामुळे त्यांनी आमदाराकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे येथे पोटनिवडणूक पार पडली. येथे भाजपकडून नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली होती.

या मतदारसंघात भाजपचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे येथे ते सहज जिंकतील असा त्यांना विश्वास होता. पण प्रशांत किशोर यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला. भाजपसाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशीची झाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. त्या निवडणुकीत प्रशांत किशोर हे उमेदवार नव्हते. मात्र या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा उतरण्याचा निर्णय घेतल्याने जनसुराज्य खाते उघडणार का याकडे लक्ष लागले आहे.

Amit Shah, Narendra Modi
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा 'एक्झिट' बॉम्ब : "राजकारणाचाउबग येतो, निवृत्त व्हावंसं वाटतं..."

कमी मतदान चिंता वाढवणारे

राज्यातील सर्वाधिक सुशिक्षित मतदारसंघ म्हणून बांकीपूरकडे पाहिले जाते. मात्र य पोटनिवडणुकीत अवघे ३५ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची घटलेली टक्केवारी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. मात्र बूथ यंत्रणेमुळे भाजपकडून विजयाचा दावा केला जात आहे.

मोदी शहांची प्रतिष्ठा पणाला

बांकीपूर विधानसभा मतदारसंघाकडे केवळ पोटनिवडणूक म्हणून पाहिले जात नाही. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा हा परंपरागत मतदार संघ आहे. त्यामुळे भाजपचा पराभव झाला तर त्याचा संबंध थेट मोदी-शहा यांच्या प्रतिष्ठेशी जोडला जाऊ शकतो. नुकत्याच झालेल्या कॉकरोच जनता पार्टी, झेन जीच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर या निवडणुकीचा निकाल विरोधात गेला तर भाजप बॅकफूटवर जाईल.

Amit Shah, Narendra Modi
Exit Poll : भाजपचा पराभव निश्चित? हक्काची जागा गमवणार, एक्झिट पोलने उडवली झोप!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com