Exit Poll : भाजपचा पराभव निश्चित? हक्काची जागा गमवणार, एक्झिट पोलने उडवली झोप!

BJP Defeat Bankipur Vs Prashant Kishor : जंतर मंतरच्या आंदोलनानंतर भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार भाजपला आपली हक्काची जाग गमवावी लागू शकते.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

BJP News : बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये नुकतीच पोटनिवडणूक झाली. बांकीपूर विधानसभेची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आमदाराकीचा राजीनामा दिल्याने येथे निवडणूक होत आहे. बांकीपूर हा भाजपचा गड मानला जातो. मात्र, जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर येथून निवडणूकीच्या मैदानात आहेत.

एक्झिट पोलमध्ये प्रशांत किशोर येथून विजय होताना दिसत असून भाजपचा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता वर्तवली आहे. पाॅलिटिकल रिचर्ज एजन्सी जनमत पोल्सच्या एक्झिट पोलनुसार प्रशांत किशोर तब्बल 49 ते 52 टक्के मतं घेत विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, भाजप उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांना केवळ 34 ते 36 टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

डीवी रिचर्जच्या एक्झिट पोलनुसार देखील प्रशांत किशोर हे विजयी होताना दिसत आहेत. त्यांना 43 टक्के मतं तर भाजप उमेदवाराला 39 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.

भाजपचे टेन्शन वाढले

भाजपसाठी बांकीपूरची जागा ही प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या होम ग्राऊंडवर पराभव झाला तर देशात त्याचा वेगळा मेसेज जाईल, अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे. बिहारमधीस सर्वात सुशिक्षित मतदारसंघ बांकीपूर आहे. मात्र, पोटनिवडणूक येथे केवळ 35 टक्के मतदान झाले आहे. हे घटलेले मतदान भाजपची चिंता वाढवणारे आहे

Narendra Modi, Amit Shah
BJP news : भाजपवर मोठी नामुष्की; राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातच उमेदवाराने दिला झटका, काही तासांतच अर्ज घेतला मागे

विजयाचा दावा कायम

मतदानची टक्केवारी घटली असली तसेच एक्झिट पोलमध्ये प्रशांत किशोर हे विजयी होताना दिसत असले तरी भाजप नेत्यांनी वेगळाच दावा केला आहे. स्थानिक भाजप नेत्यांच्या मतानुसार, भाजपची बुथ स्तरावरील यंत्रणा येथे मजबुत आहे. त्यामुळे भाजपचे हक्काचे मतदान झाले आहे. त्यामुळे भाजप उमेदवार येथे सहज विजयी होईल.

Narendra Modi, Amit Shah
BJP News : विधानपरिषदेतील पराभव भाजपच्या जिव्हारी; फुटलेल्या एका एकाला शोधून हिशेब चुकता करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com