BJP Defeated : भाजप पराभवाच्या उंबरठ्यावर, 30 वर्ष सत्ता असलेला मतदारसंघ गमवणार, 'पीके' पॅटर्नची हवा!

Bankipur Bypoll Prashant kishor leading : भाजपचा गड असलेल्या बांकीपूर मतदारसंघात ते पि‍छेहाटीवर पडले आहे. प्रशांत किशोर यांनी तब्बल 9 हजाराची आघाडी घेत विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

BJP defeated in 30-year stronghold: भाजपला पोटनिवडणुकीत मोठा धक्का बसत असल्याचे चित्र आहे. तब्बल 30 वर्ष वर्चस्व असलेला मतदारसंघ भाजपच्या हातून निसटत आहे. बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा हे पराभवाच्या छायेत असून प्रशांत किशोर हे मतमोजणीच्या 16 व्या फेरीनंतर तब्बल 8 हजार 966 मतांनी आघाडीवर होते. तर, 17 व्या फेरीनंतर त्यांची आघाडी 9हजार 581 येवढी झाली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे भाजपचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यसभेवर ते विजयी झाल्याने त्यांनी येथून आमदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र, पोटनिवडणुकीत हा मतदारसंघात भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. मजमोजणीच्या 31 फेरी आहेत. आत्ता 16 फेऱ्यांची मोजणी झाली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीपासून जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे आघाडीवर असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या स्थानावर नीरज कुमार आणि तिसऱ्या स्थानावर आरजेडीचे उमेदवार रेखा कुमारी या आहेत.

प्रत्येक फेरीमध्ये प्रशांत किशोर यांचे लीड वाढताना दिसत आहे. त्यामुळे जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पोटनिवडणुकीत केवळ 35 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजुने लागणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती.

Narendra Modi, Amit Shah
Election Results : भाजपला तीनपैकी दोन बालेकिल्ल्यांमध्ये धक्का; विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालात सुरूवातीचे कल विरोधात

नवीन परिवाराचे वर्चस्व

बांकीपूर मतदारसंघ हा पूर्वी पटना पश्चिम नावाने ओळखला जात होता. मात्र, मतदार पुनर्रचनेमध्ये त्याचे नाव बदलून बांकीपूर करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा हे पहिल्यांदा येथून विजयी झाले. त्यांनी चार वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले. 2006 मध्ये त्यांचे निधन झाले.

त्यानंतर त्यांचे पुत्र नितीन नवीन येथून विजयी झाले. 2008 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली तेव्हा या मतदारसंघाचे नाव बांकीपूर झाले. मात्र, येथून 2010 ते 2025 असे सलग चार वेळा येथून नतीन नवीन विजयी झाले. मात्र, 2025 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते राज्यसभेवर गेले.

Narendra Modi, Amit Shah
BJP Vs Prashant Kishor : भाजपचा मोठा पराभव की 'पीके'चे पॅकअप; मोदी- शहांची प्रतिष्ठा पणाला, आजच फैसला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com