BHAVYA Scheme : मोदी सरकारकडून ‘भव्य’ योजनेची घोषणा; तब्बल 33 हजार 660 कोटींचे बजेट, तुम्हाला होणार का फायदा? वाचा सविस्तर...

Bharat industrial development programme : ‘भव्य’ योजनेअंतर्गत देशात ठिकठिकाणी १०० अत्याधुनिक औद्योगिक पार्क उभारण्यात येणार आहेत.
cabinet decisions modi Government
cabinet decisions modi GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Union cabinet approval : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली असून त्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातीलच एक निर्णय म्हणजे ‘भव्य’. केंद्र सरकारने या नव्या योजनेची घोषणा केली असून त्यासाठी मोठे बजेटही निश्चित केले आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यानुसार ‘भव्य’ म्हणजे भारत औद्योगिक विकास योजना (BHAVYA). सरकारची ही महत्वाकांक्षी योजना असून त्यासाठी तब्बल ३३ कोटी ६६० कोटी रुपयांचे मोठे बजेट निश्चित करण्यात आले आहे.

काय आहे ही योजना?

‘भव्य’ योजनेअंतर्गत देशात ठिकठिकाणी १०० अत्याधुनिक औद्योगिक पार्क उभारण्यात येणार आहेत. या पार्कमध्ये उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित केले जाणार आहे. पार्कमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आधीपासूनच उपलब्ध असतील. त्याचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे.

cabinet decisions modi Government
Modi Shah political strategy : मोदी-शहांचे पुन्हा धक्कातंत्र; मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बदलणार? घडामोडींना वेग...

ही योजना सहा वर्षांपर्यंत लागू असणार आहे. म्हणजेच आर्थिक वर्षे २०३१-३२ पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. योजनेच्या माध्यमातून भारताच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेचा थेट फायदा उद्योजकांसह स्थानिकांनीही होणार आहे.

उद्योजकांना कंपनी सुरू करायची असल्यास कागदपत्रे सादर करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी सर्व सुविधा पार्कमध्येच असतील. सरकारकडून पार्कमध्येच जमिनीसोबत पाणी, वीज, रस्ते व वाहतुकीच्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. कंपन्यांना केवळ आपल्या कारखान्याची उभारणी करावी लागणार आहे.

cabinet decisions modi Government
Rupali Chakankar News : बलात्कारप्रकरणी अटक केलेल्या अशोक खरातच्या संस्थेशी थेट संबंध, पाद्यपुजेचा व्हिडीओही समोर; रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया...

सरकारकडून संबंधित औद्योगिक पार्क जागतिक दर्जाच्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी प्रति एकर एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही केली जाणार आहे. उद्योग-व्यवसाय सुरू करणे, अधिक पारदर्शक आणि गतिमान व्हावे, यापध्दतीने त्याची रचना करण्यात येणार आहे.

औद्योगिक पार्क उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमिनीची आवश्यकता असले. ईशान्येकडील राज्यांना याबबात सूट देण्यात आली आहे. या राज्यांमध्ये केवळ २५ एकर जमिनीवरही पार्क विकसित केले जाऊ शकते. या भागातील औद्योगिक विकास आणि रोजगाराला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com