

Raipur POlitical News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच छत्तीसगडमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात अॅपच्या प्रवर्तकांनी भूपेश बघेल यांना आतापर्यंत 508 कोटी रुपये दिल्याचा खुलासा ईडीने केला आहे. ईडीने पैशाची देवाण-घेवाण करणाऱ्या एका व्यक्तीचा जबाब नोंदवला असून, त्याने महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडी तपास करत आहे.
पण, यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो, असे म्हणत मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित व्यक्तीवर दबाव टाकून त्याला माझी प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे बघेल यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर सीएम भूपेश बघेल यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर करून ईडीच्या आरोपांवर भाष्य केले आहे.
"मी आधीच म्हटल्याप्रमाणे, भारतीय जनता पक्षाला (BJP) ईडी, आयटी, डीआरआय आणि सीबीआय यांसारख्या एजन्सींच्या मदतीने छत्तीसगडची निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीच्या आधी, ईडीने माझ्या पक्षाला कलंकित करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला आहे. लोकांनी निवडून दिलेल्या काँग्रेस सरकारला बदनाम करण्याचा हा राजकीय प्रयत्न आहे आणि तो ईडीच्या माध्यमातून केला जात आहे. 'महादेव अॅप'च्या कथित तपासाच्या नावाखाली ईडी'ने आधी माझ्या जवळच्या लोकांच्या घरावर छापे टाकले आणि आता अज्ञात त्या व्यक्तीच्या वक्तव्याच्या आधारे माझ्यावर 508 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.
ईडीची चालाखी पाहा, की एका अज्ञात व्यक्तीच्या एका वक्तव्यावरून त्यांनी छोट्या वाक्यात ते विधान तपासाचा विषय असल्याचे लिहिले आहे. जर तपास झाला नसेल तर एका व्यक्तीच्या वक्तव्यावर प्रसिद्धिपत्रक जारी केल्याने ईडी'चा हेतू तर उघड होतोच, पण त्यामागील केंद्र सरकारचा वाईट हेतूही उघड होतो. राज्यात सध्या निवडणुका होत आहेत. सर्व काही निवडणूक आयोगाच्या हातात आहे. पोलिसांव्यतिरिक्त सीआरपीएफ'चे जवान तपास करत आहेत.अशा परिस्थितीत एवढी मोठी रक्कम घेऊन लोक छत्तीसगडमध्ये कसे पोहोचू शकतील, असा प्रश्न उपस्थित होतो. यातही केंद्रीय एजन्सींचा काही संबंध आहे का? ईडी'चे अधिकारी आणि सुरक्षा एजन्सी ज्या विशेष विमानाने पोहोचल्या, त्यातूनच तर ही रक्कम आणली असावी का?'' असाही प्रश्न बघेल यांनी त्यांच्या पोस्ट उपस्थित केला आहे.
तसेच, "पंतप्रधान नरेंद्र मोदी (NarendraModi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एकत्र छत्तीसगडमध्ये काँग्रेसशी स्पर्धा करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना तपास यंत्रणांच्या मदतीने निवडणूक लढवायची आहे. मी काँग्रेसविरोधात उघड वक्तव्ये केली आहेत. ईडी आणि जनतेला सांगितले. ईडी कशी काम करते हे मी तुम्हाला सांगत आहे. ती आधी लोकांची नावे ठरवते, नंतर त्यांना अटक करते, त्यांना धमकावते आणि नावे घेण्यास भाग पाडते. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. मारहाण , धमकावणे या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत. काँग्रेस तयार आहे. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता तयार आहे. ईडी, आयटीसारख्या एजन्सींशी लढण्यासाठी छत्तीसगडची जनता आमच्यासोबत आहे. आम्ही लढू आणि जिंकू," असा विश्वाही बघेल यांनी व्यक्त केला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.