Bihar Cabinet Expansion : नितीन कुमारांचा मुलगा मंत्री होणार, आजच शपथविधी! सम्राट चौधरींच्या मंत्रिमंडळात 28 जणांना संधी

Nishant Kumar Minister : मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. तब्बल 28 जण मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.
CM Nitish Kuma Nishant Kumar
Nitish Kumar Nishant Kumar sarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहाराचे मुख्यमंत्री सम्राट चौधीर यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत आहे. संभाव्या मंत्र्यांना शपथविधीसाठी फोन केले जात आहे. या सर्वांमध्ये माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याची चर्चा होती. मात्र, या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून निशांत कुमार हे मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.

शपथ ग्रहण समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गृह मंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित राहणार आहेत. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झाला आहे.

जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि उपमुख्यमंत्री विजय चौधरी हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री ललन सिंह नीतीश कुमार यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीला हजेरी लावली आहे.

CM Nitish Kuma Nishant Kumar
Bihar CM Name: बिहारचे नवे 'सम्राट' निश्चित! मुख्यमंत्रीपदी 'भाजपकडून' चौधरींची निवड, शपथविधीचा मुहूर्तही ठरला

नितीश कुमारांवर टीका

तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने निशांत कुमार यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याच्या निर्णयानंतर नितीश कुमार यांच्यावर टीका केली. आरजेडीने ट्विट करत म्हटले आहे की, वडीलांनी आयुष्यभर परिवारवादावर लेक्टर दिले आणि मुलाला राजकारणात सेटल करण्याच्या अटीवर खुर्ची सोडली. मागच्या दरवाजाने मुलाला मंत्री करण्यापेक्षा एखाद्या कार्यकर्त्याला संधी का नाही दिली? असा सवाल देखील केला.

मित्रपक्षांमधून कोणाला संधी?

भाजप आणि जेडीयुसोबत चिराग पासवान,जीतन राम मांझी और उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष देखील सत्तेत सहभागी आहे. या पक्षांकडून संजय पासवान,संजय सिंह,संतोष सुमन, दीपक प्रकाश यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

CM Nitish Kuma Nishant Kumar
Bihar government : बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा नितीश कुमारांसह भाजप नेत्याला जोरदार धक्का; शपथविधीनंतर काही दिवसांतच झाले आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com