Bihar government : बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा नितीश कुमारांसह भाजप नेत्याला जोरदार धक्का; शपथविधीनंतर काही दिवसांतच झाले आक्रमक

Nitish Kumar news, BJP Bihar politics : सम्राट चौधरी यांच्या या आक्रमक भूमिकेची आता बिहारमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सम्राट चौधरी यांच्या निर्णयांकडे लक्ष संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
Nitish Kumar, Samrat Choudhary
Nitish Kumar, Samrat ChoudharySarkarnama
Published on
Updated on

Samrat Choudhary Bihar CM News : बिहारचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी शपथविधीनंतर काही दिवसांतच आक्रमक भूमिका घेत कामाला सुरूवात केली आहे. राज्यात मुख्यमंत्रिपदावर पहिल्यांदाच भाजपचा नेता विराजमान झाला आहे. त्यामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलामध्ये नाराजी आहे. त्यातच आता नव्या मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांतच नितीश कुमार आणि भाजपच्या बड्या नेत्याला झटका दिला आहे.

सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार सरकारने घेतलेले दोन निर्णय रद्द केले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही निर्णय भाजपचे ज्येष्ठ नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याकडे असलेल्या महसूल खात्याशी संबंधित आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांमधील वादाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. सिन्हा हेही मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आघाडीवर होते.

कोणते निर्णय बदलले?

बिहारमधील महसूल विभागातील कर्मचारी विविध मागण्यांसाठी ११ फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत संपावर होते. तेव्हा विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे महसूल व भूमी सुधारणा विभाग होता. या संपावर आक्षेप घेत महसूल विभागाने २२४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. सम्राट चौधरी यांच्या सरकारने हा निर्णय फिरवत निलंबन रद्द केले आहे.

Nitish Kumar, Samrat Choudhary
Arvind Kejriwal news : भर कोर्टात महिला न्यायाधीशांना समोरासमोर भिडणाऱ्या केजरीवालांना धक्का; याचिका फेटाळत कोर्टाने ठणकावले...

बिहार सरकारने काही महिन्यांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांबाबत महत्वाचा निर्णय घेतला होता. तत्कालीन नितीश सरकारने निर्णय घेतला होता की, कोणत्याही सरकारी विभागातील कर्मचारी केवळ एकदाच विभागीय परीक्षा देऊ शकतो. हा निर्णय नव्या सरकारने रद्द केला आहे. नितीश सरकारच्या निर्णय़ामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती.

Nitish Kumar, Samrat Choudhary
Indian Army news : भारतीय लष्कराचा पाकिस्तानला कडक इशारा; काही सीमा कधीच ओलांडायच्या नसतात, भारत...

सम्राट चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय रद्द केला. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची चर्चा आहे. दरम्यान, चौधरी यांच्या या आक्रमक भूमिकेची आता बिहारमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सम्राट चौधरी यांच्या निर्णयांकडे लक्ष संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com