Bihar Government : बिहारमध्ये मोठी घडामोड; नव्या सरकारचा फॉर्म्यूला ठरला, CM, DCM कोण, मंत्री किती?

Bihar BJP JDU alliance : नव्या सरकारमध्ये एकूण ३० मंत्री असतील. त्यातील भाजप आणि जेडीयूच्या वाट्याला प्रत्येकी १५ मंत्रिपदं येऊ शकतात. उपमुख्यमंत्रिपद जेडीयूकडे असेल, अशी चर्चा आहे.
PM Modi, Nitish Kumar
PM Modi, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar power sharing formula : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरूवारी धक्कादायक निर्णय घेत राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या नेत्याने राज्यसभेवर जाण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. या घडामोडींनंतर आता बिहारमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

बिहारच्या नव्या सरकारसाठी आधीपासूनच तयारी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. नितीश कुमार आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी आधीच नव्या सरकारचा फॉर्म्यूलाही ठरविल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार सध्या बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नव्या सरकारचे प्रमुखपद म्हणजे सीएम भाजपचा असेल, हे स्पष्ट झाले आहे.

नव्या सरकारमध्ये एकूण ३० मंत्री असतील. त्यातील भाजप आणि जेडीयूच्या वाट्याला प्रत्येकी १५ मंत्रिपदं येऊ शकतात. उपमुख्यमंत्रिपद जेडीयूकडे असेल, अशी चर्चा आहे. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे नवे उपमुख्यमंत्री असतील. यावेळी केवळ एकच उपमुख्यमंत्री असतील, असा फॉर्म्यूला ठरल्याची चर्चा आहे. सध्याच्या सरकारमध्ये भाजपचे दोन उपमुख्यमंत्री आहेत.

PM Modi, Nitish Kumar
Priyanka Chaturvedi : राज्यसभेचे तिकीट नाकारले; आदित्य ठाकरे नाराज? प्रियांका चतुर्वेदींची पोस्ट, म्हणाल्या, जिंकून येणार...

मित्रपक्ष असलेल्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला दोन आणि उपेंद्र कुशवाह व जीतनराम मांझी यांच्या वाट्याला प्रत्येकी एक मंत्रिपद येऊ शकते. याशिवाय विधानसभेचे अध्यक्षपदही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे आमदार प्रेम कुमार हे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडेच हे पद येऊ शकते, अशी चर्चा आहे.

भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सध्या उपमुख्यमंत्री असलेले सम्राट चौधरी यांच्या नावाचीच अधिक चर्चा आहे. त्याचप्रमाणे भाजप धक्कातंत्राचाही वापर करू शकते. यापूर्वीही अन्य राज्यांमध्ये भाजपने मुख्यमंत्रिपदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. बिहारमध्ये तोच फॉर्म्यूला वापरला जाऊ शकतो.

PM Modi, Nitish Kumar
Nitish Kumar news : देशाच्या राजकारणात खळबळ; नितीश कुमारांचा मुख्यमंत्रिपद सोडण्याचा धक्कादायक निर्णय, म्हणाले, नवे सरकार...

दरम्यान, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही तासांतच नितीश कुमार यांनी पाटणा येथे पक्षाची बैठक बोलावली आहे. नितीश कुमार यांनी अचानक राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेक नेते व कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांच्याकडून पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांना आपण राज्यसभेवर जाणार असलो तरी सरकार आपल्याच मार्गदर्शनाखाली चालणार असल्याचे पटवून दिले जाईल. असे असेल तरी पुढील महिनाभर बिहारमधील राजकीय वातावरण तापलेले असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com