

पप्पू यादव यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे.
बिहार राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे.
या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Pappu Yadav Women Politics : पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यांच्यावर कारवाईची तलवार लटकत आहे. अलीकडेच पप्पू यादव यांनी राजकारणात काम करणाऱ्या महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी, ९० टक्के महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत, असे म्हटले होते. आता या वक्तव्यावरून खळबळ उडाली असून बिहार राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. आयोगाने पप्पू यादव यांना याबाबत मंगळवार, 21 एप्रिल 2026 रोजी नोटीस बजावली असून उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
पप्पू यादव यांनी, 20 एप्रिल रोजी महिला आरक्षणावर वादग्रस्त विधान केले होते. यावेळी पप्पू यादव म्हणाले होते की, महिलांच्या सुरक्षेवर लक्ष दिले जात नाहीये. देशात लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये नेत्यांची मोठी भूमिका आहे आणि अनेक खासदारांवर गंभीर आरोप आहेत. ९० टक्के महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत, त्यांच्या राजकीय करिअर नेत्यांच्या बेडवरून सुरू होते.
या वक्तव्यावरून आता एकच खळबळ उडाली असून याची दखल स्वतःहून बिहार राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी पप्पू यादव यांना नोटीस पाठवली आहे. ज्यात त्यांनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये आपण राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांबद्दल अत्यंत घृणास्पद वक्तव्य केलं आहे.
राजकारणात काम करणाऱ्या महिला कोणत्या ना कोणत्या राजकारण्यासोबत ‘बेड शेअर’ करूनच पुढे येतात. ९० टक्के महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत. दररोज सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होत असतात. शाळा असो किंवा कार्यालय, प्रत्येक ठिकाणी महिलांचे शोषण होते, असे तुम्ही म्हटलं आहे. तुमचे हे विधान महिलांचा आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणारे आहे.
यामुळे आता असे घृणास्पद वक्तव्य आपण का केले? याचे उत्तर आयोग मागत आहे. तर तुमचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे शिफारस का केली जाऊ नये? याचेही स्पष्टीकरण पत्र मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत सादर करावे, असे आयोगाने पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. या नोटीसवरूनच आता पप्पू यादव यांची खासदारकी धोक्यात आल्याचे बोलले जात असून पप्पू यादव आपल्या स्पष्टीकरणात काय म्हणतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
1. पप्पू यादव यांना नोटीस का देण्यात आली?
महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे महिला आयोगाने नोटीस दिली.
2. नोटीस कोणी दिली आहे?
बिहार राज्य महिला आयोगाने नोटीस जारी केली आहे.
3. नोटीस कधी जारी करण्यात आली?
२१ एप्रिल २०२६ रोजी नोटीस जारी करण्यात आली.
4. आयोगाने काय मागणी केली आहे?
पप्पू यादव यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.
5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय वाद वाढू शकतो आणि पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.