Rajya Sabha nominations BJP news : राज्यात सध्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असून माघारीच्या दिवशीच तब्बल पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे राज्यातील भारतीय जनता पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच आता राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामुळे आता अनेकांचे लक्ष या घोषणेकडे गेले असून सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधत भाजपने मास्टरस्ट्रोक मारल्याचे बोलले जात आहे.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदावारीत गुजरात, मध्य प्रदेश, मणिपूर, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि पंजाबचा समावेश असून बड्या नेत्यांनी संधी देण्यात आली आहे. तर पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांचा तपशील आणि प्रमुख नेत्यांची पार्श्वभूमी पाहिल्यास भाजपने उमेदवारांची निवड करताना संघटनात्मक कौशल्याचा आणि राजकीय प्रभावाचा विचार केल्याचे दिसत आहे. तसेच भाजपने २०२६ च्या पोटनिवडणुकीसाठी ओडिशातून देबाशीष सामंतराय यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने जाहीर केलेले उमेदावार
अरुणाचल प्रदेश : ताई तागक
गुजरात : राजुभाई शुक्ला, मुकेशभाई रथवा आणि मानसिंग परमार
मध्य प्रदेश : तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल
मणिपूर : ए.शारदा देवी
राजस्थान : अलका गुर्जर आणि सतिश पुनिया
ओडिशा : देबाशीष सामंतराय
सतीश पुनिया हे राजस्थान भाजपचे ज्येष्ठ नेते असून सध्या त्यांच्याकडे हरियाणा भाजपचे प्रभारी म्हणून मोठी जबाबदारी आहे. त्यांनी यापूर्वी राजस्थान विधानसभेत विरोधी पक्ष उपनेते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते स्वत: जाट समाजाचे असल्याने राजस्थान आणि हरियाणात त्यांना सामाजिक आणि राजकीय संतुलनाचा मोठा अनुभव आहे.
दरम्यान पंजाबमध्ये संभाव्य २०२७ च्या विधान सभेच्या निवडणुका पाहता तरुण चुग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चुग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असून भाजपचे राष्ट्रीय महासचिव असून त्यांना देखील संकटमोचक म्हटलं जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.