BJP Congress Leaders Wedding: राजकीय वैर विसरून बनले व्याही; भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलाचा काँग्रेस आमदाराच्या मुलीशी विवाह!

Shahnawaz Hussain Son Wedding: भाजप नेते शाहनवाज हुसैन यांचा मुलगा अरबाज आणि काँग्रेस आमदार अकरम खान यांची मुलगी अफशां खान विवाहबंधनात; भाजप-काँग्रेसचे नेते आता झाले व्याही!
BJP Congress Leaders Wedding
BJP Congress Leaders WeddingBJP Congress Leaders Wedding
Published on: 
Updated on: 

Political wedding news: राजकारणात भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकमेकांचे विरोधक असले, तरी एका विवाहसोहळ्यामुळे दोन्ही पक्षांतील दोन नेत्यांचे कुटुंबीय नात्याने जोडले गेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन यांचा मुलगा अरबाज हुसैन याचा विवाह हरियाणातील काँग्रेस आमदार अकरम खान यांची मुलगी अफशां खान हिच्याशी नुकताच झाला. दिल्लीमध्ये पार पडलेल्या या विवाहामुळे राजकीय वर्तुळात या दोन नेत्यांच्या नव्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे.

अकरम खान भावूक

अफशां यांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर केली आहेत. वडील अकरम खान यांच्यासोबतचा भावनिक व्हिडिओही चर्चेत आला. यामध्ये मुलीच्या लहानपणी खेळणी आणण्यापासून ते लग्नाचा पोशाख आणण्यापर्यंतचा प्रवास सांगताना अकरम खान भावूक झाल्याचे दिसते. अफशां यांनी राहुल गांधी यांच्यासोबतचे छायाचित्रही शेअर केले असून, त्यांना लग्नाचे निमंत्रण दिल्याचे त्यातून दिसते.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

दिल्लीतील चाणक्यपुरी येथील पीएसओआय क्लबमध्ये अरबाज आणि अफशां यांचा विवाह झाला. या विवाहसोहळ्याला हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील नेते उपस्थित होते.

रिसेप्शनला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर आणि काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्यासह विविध पक्षांतील नेते उपस्थित होते. त्यामुळे हा विवाहसोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता राजकीय वर्तुळातील चर्चेचाही विषय ठरला.

BJP Congress Leaders Wedding
Maharashtra Politics: निलेश राणेंनी 'लायकी' काढली, नवनाथ बन यांनी थेट नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर केला; कॅप्शनची चर्चा!

कोण आहेत अफशां खान?

अफशां खान या हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील खिजरी गावचे रहिवासी आणि जगाधरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अकरम खान यांच्या कन्या आहेत. त्यांनी मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे कुटुंब गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहे. अफशां यांचे आजोबा चौधरी मोहम्मद असलम खान यांनी 1987 आणि 1991 मध्ये छछरौली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला होता.

BJP Congress Leaders Wedding
Census 2027: जनगणनेच्या तारखा जाहीर! घरोघरी होणार नोंदणी; निवडणूक असलेल्या राज्यांना तूर्तास सूट, कोणते प्रश्न विचारणार?

अकरम खान यांचा राजकीय प्रवास

अफशां यांचे वडील अकरम खान यांनी 1996 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर 1999 मध्ये ओमप्रकाश चौटाला यांच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. पुढे ते हरियाणा विधानसभेचे उपाध्यक्षही झाले. 2009 मध्ये बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर जगाधरी मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी पुन्हा विजय मिळवला.

BJP Congress Leaders Wedding
FDA Action: मसाल्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांना FDAचा दणका! 19.7 कोटींचा माल जप्त, 84 परवाने निलंबित; 'या' शहरात सर्वाधिक कारवाई

अरबाज हुसैन काय करतात?

शाहनवाज हुसैन यांचे पुत्र अरबाज यांचा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. शाहनवाज हुसैन हे मूळचे बिहारमधील सुपौलचे रहिवासी आहेत. त्यांनी 1994 मध्ये रेणू शर्मा यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना अरबाज आणि अदीब अशी दोन मुले आहेत.

शाहनवाज हुसैन यांनी 1999 मध्ये किशनगंज लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत संसदेत प्रवेश केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अन्नप्रक्रिया, कोळसा, नागरी विमान वाहतूक आणि वस्त्रोद्योग अशा विविध मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.