हरला तरी काळजी नको! उत्पल पर्रीकर यांच्यासाठी भाजपचा असा आहे खास 'प्लॅन'

भाजपने उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.
Utpal Parrikar and Atanasio Monserrate News Updates
Utpal Parrikar and Atanasio Monserrate News UpdatesSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना भाजपने पणजी विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारले आहे. गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरूवारी उमेदवारी यादी जाहीर केली असून, पर्रीकरांना डावलण्यात आले आहे. (BJP Denied Ticket to Utpal Parrikar) पण त्यांच्यासाठी भाजपने खास प्लॅन तयार केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Election 2022) रंगत वाढू लागली आहे. भाजपने गुरूवारी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली. पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना भाजपने तिकिट दिले आहे. यामुळे उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांनी पणजीतूनच तिकीट देण्याची मागणी केली होती. पण बाबूश यांना पत्ता कट करणं भाजपला परवडणारं नसल्याने पर्रीकर यांना इतर दोन मतदारसंघातून लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. (Goa Political News)

Utpal Parrikar and Atanasio Monserrate News Updates
अखंडपणे 50 वर्षे प्रज्वलित असलेली 'अमर जवान ज्योत' आज विझणार; मोदी सरकारचा निर्णय

याबाबत फडणवीस यांनीच गुरूवारी स्पष्टीकरण दिलं आहे. गोव्यातील अद्याप सहा जागांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातील दोन जागांची ऑफर पर्रीकर यांना देण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर उत्पल यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यातून निश्चितपणे मार्ग निघेल, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही केला आहे. त्यामुळे आता उत्पल हे या जागांबाबत काय निर्णय घेणार, हे एक-दोन दिवसांत समजेल.

पणजी वगळून इतर ठिकाणाहून निवडणूक लढल्यानंतर पराभव झाला तरी भाजपने उत्पल यांच्यासाठी खास प्लॅन केल्याचे एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. उत्पल यांना 2027 च्या निवडणुकीवेळी राजकारणात लॉन्च करण्याचा प्लॅन भाजपने आखला आहे. याबाबत उत्पल यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे ते इतर ठिकाणी लढले आणि हारले तरी त्यांना संघटनेत मोठे स्थान दिले जाईल, असे सुत्रांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. (Utpal Parrikar News Updates)

दरम्यान, पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या मृत्यूने गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. पणजीत मागील दोन महिन्यांपासून ते प्रचार करीत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. आता मागे वळून पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. आपसह इतर राजकीय पक्षांनीही त्यांना उमेदवारीची ऑफर दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com