

Ahilyanagar illegal diesel case : अहिल्यानगर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी श्रीगोंदा इथं हवाई इंधनाची 88 लाख रुपयांची चोरी पकडली होती. यानंतर पुन्हा एकदा खाणकामासाठी थेट मुंबईतून गडचिरोलीकडे टँकरद्वारे होत असलेल्या अवैध डिझेल तस्करीचा प्रकार उघडकीस आणला आहे.
देशात इंधन दरवाढीचं स्वागत होत असतानाच, अन् राज्य सरकार राज्यातील 21 पोलिस अधीक्षकांच्या बदली कार्यवाहीचा आदेश काढत असतानाच, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ही दणकेबाज कारवाई यशस्वी केली.
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मुंबईतून (Mumbai) गडचिरोतील खाणकामासाठी अवैधरित्या डिझेलची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार टँकरनंबर देखील मिळाला होता. याचवेळी कोपरगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पेट्रोलिंगवर होते.
पोलिस (Police) निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पथकाला अलर्ट करत, कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने समृद्धी महामार्गावर सापळा लावला. मिळालेल्या नंबर टँकरच्या नंबरशी मॅच होताच, पथकाने सापळा आवळला. महामार्गावर धावता टँकर बाजूला घेत, चालक महादेव वचिष्ट डांगे (वय 50, रा. शिवाजीनगर, नेरूळ, नवी मुंबई, मुळ रा. सोलापूर) याला ताब्यात घेतला.
टँकर चालक महादेव डांगे याच्याकडे पथकाने चौकशी केल्यावर त्याने डिझेल भरण्यासाठी लोकेशन देणारा याचा मोबाईल क्रमांक, प्रतीक सानप हा लोकेशन पाठवणारा आणि प्रमोद हरणे याच्या सांगण्यावरून, टँकर सुरजागड (जि. गडचिरोली) इथं घेऊन जाणाऱ्यांची नावे सांगितले. यात लोकेशन देण्यासाठी प्रतीक सानप देईल, याचा मोबाईल क्रमांक पथकाने रिकव्हर केला आहे. अशा एकूण चार जणांच्या टोळीविरोधात कोपरगाव पोलिस ठाण्यात पथकाने गुन्ह्याची नोंद केली आहे.
महादेव डांगे याने पथकाच्या प्राथमिक चौकशीत, साई प्रसाद पेट्रोल पंप, स्टेट हायवे 44 वरील हिंदुस्थान पेट्रोल पंप आणि शहापूर खर्डी रोडवरील हिदुस्थान पेट्रोल पंपावरून हे डिझेल लिटरमागे अगदी कमी पैशात आणि कोणतीही नोंद न घेता उचलल्याची माहिती दिली. सरकारशी कोणत्याही प्रकारचा करारनामा, परवाना न घेता, बेकायदेशीर आणि अवैधरित्या ही डिझेल वाहतूक आढळून आली.
चालक डांगे याच्या ताब्याताली 25 लाखाचा टँकर, 30 लाख 87 हजार 840 रुपये किंमतीचे 34 हजार लिटर डिझेल, असा एकूण 55 लाख 87 हजार 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 125,223,287, सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955चे कलम 3, 7, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.