पेट्रोलच्या दरवाढीवर भाजपचा मंत्री म्हणाला, लोकांचे उत्पन्न वाढले म्हणूनच...

दिवाळीच्या तोंडावर जनतेला इंधन दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. यातच आता भाजपच्या मंत्र्याने लोकांचे उत्पन्न वाढल्याने दरवाढ झाल्याचा शोध लावला आहे.
Mahendra Singh Sisodia
Mahendra Singh SisodiaSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. यामुळे दिवाळीच्या तोंडावर जनतेला इंधन दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. यातच आता भाजपच्या (BJP) मंत्र्याने लोकांचे उत्पन्न वाढल्याने दरवाढ झाल्याचा शोध लावला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 35 पैशांची वाढ करण्यात आली. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 110.04 रुपये तर मुंबईत 115.85 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 98.42 रुपये आणि मुंबईत 106.62 रुपयांवर पोचला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत.

मध्य प्रदेशातील भाजपचे मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचे वेगळेच कारण सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, लोकांचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे वाढते दर स्वीकारायला हवेत. लोकांनी दरवाढ मान्य करायलाच हवी. ते दशकभरापूर्वीच्या पेट्रोल, डिझेल दरांची आता अपेक्षा करू शकत नाहीत. सरकार काहीही मोफत देणार नाही. सरकारचा संपूर्ण महसूल इंधनावरील करातून येतो. याच पैशातून सरकारच्या सगळ्या योजनांना निधी मिळतो.

Mahendra Singh Sisodia
मोदी सरकारचा दिवाळी धमाका : पेट्रोल, डिझेलचा 'आठवडी बोनस'

लोकांनी समजून घ्यायला हवे की त्यांचे उत्पन्न आता वाढले आहे. त्यामुळे त्यांनी महागाईही स्वीकारायला हवी. तुम्ही 10 वर्षांपूर्वी 6 हजार रूपये कमावत होता. आता तुम्ही 50 हजार रुपये कमावत असाल तर तुम्ही 10 वर्षांपूर्वीचे पेट्रोल, डिझेलचे दर हवेत, असे म्हणू शकत नाही, असे गणितही सिसोदिया यांनी मांडले.

Mahendra Singh Sisodia
अखिलेश यादव विधानसभा लढणार की नाही? अखेर समाजवादी पक्षाचा मोठा खुलासा

देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे. सलग सात दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com