आता केवळ मजा बघा! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला इशारा

मागील काही दिवसांत काँग्रेसला (Congress) अनेक धक्के बसले आहेत. आता पक्षासमोर एक नवे संकट उभे ठाकल्याचे चित्र आहे.
Goa Congress

Goa Congress

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : मागील काही दिवसांत काँग्रेसला (Congress) अनेक धक्के बसले आहेत. आता आणखी एक नवे संकट उभे ठाकल्याचे चित्र आहे. गांधी कुटुंबीयांशी अत्यंत जवळीक असलेले ज्येष्ठ नेते व उत्तराखंडचे (Uttarakhand) माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांनी पक्ष सोडण्याचे थेट संकेत दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यासाठी रावत यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती. पक्षांच्या बैठकांसह भाजपच्या (BJP) आमदारांना पक्षात घेण्याची रणनीतीही त्यांनी बनविली होती. पण त्यांनी अचानक पक्षावर ट्विटबॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली. रावत यांना त्यांच्या या ट्विटबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, वेळ येईल त्यावेळी सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर मांडेन. मी तुमच्याशी नाही तर दुसऱ्या कुणाशी बोलणार? मी तुम्हाला कॉल करेन. तोपर्यंत तुम्ही केवळ मजा बघा.

<div class="paragraphs"><p>Goa Congress </p></div>
कंगना राणावत पोचली थेट पोलीस ठाण्यात !

मनात खूप चलबिचल सुरू असल्याचे सांगत नव्या वर्षात कदाचित रस्ता सापडेल, असे रावत यांनी म्हटल्याने ते काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावत यांनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'न दैन्यं न पलायनम्' या कविताचा आधार घेतला होता. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, पुन्हा एकदा मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज येत आहे, 'न दैन्यं न पलायनम्' (कोणतीही दया नको, आव्हानांना घाबरून पळायचे नाही, त्याचा सामना करायचा). खूप चलबिचल सुरू आहे, कदाचित नवे वर्ष रस्ता दाखवेल. भगवान केदारनाथ मला या स्थितीत मार्गदर्शन करतील, याचा मला विश्वास आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Congress </p></div>
कोरोनाच्या उद्रेकानंतरचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा लॉकडाऊन चीनमध्ये लागू

निवडणूकरुपी समुद्रात पोहायचे आहे. पण संघटना ठिकठिकाणी सहकार्याचा हात पुढे करण्याऐवजी तोंड फिरवून उभी राहत आहे किंवा नकारात्मक भूमिका पार पाडत आहे. ज्या समुद्रात पोहायचे आहे, त्यात सत्तेने अनेक मगरी सोडल्या आहेत. ज्यांच्या आदेशानुसार पोहायचे आहे, त्यांचे हस्तक माझे हात-पाय बांधत आहेत. मनात अनेक विचार येत आहेत की, हरीश रावत आता बास, खुप पोहलो, आता विश्रांतीची वेळ आली आहे, असं रावत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

रावत यांच्या या ट्विटबॉम्बमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. रावत हे पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी पक्षातील अंतर्गत कलह समोर आणणारी ठरली आहे. उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. त्यासाठी रावत यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. पण तेच नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्याने काँग्रेससमोर आणखी एका राज्यात संकट उभे ठाकले आहेत. रावत हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या वाटेवर जाणार की वेगळा निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com